जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:37 IST2017-08-06T21:37:25+5:302017-08-06T21:37:47+5:30

सुरु असलेली नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

Retention of teachers for old pension scheme | जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे

जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे नेतृत्व, शेकडो शिक्षकांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरु असलेली नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरु करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पाडलेल्या या धरणे आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, नरेश कोल्हे, रमेश काटेखाये, मुकेश मेश्राम, जि.प. शासकीय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, अशोक ठाकरे, विजय चाचेरे, केशव अतकरी, कैलाश चव्हाण, प्रतिभा टेंभरे, आशा गिºहेपुंजे, मंदा डोंगरे, विजया कोरे आदींनी केले.
भारत सरकारने २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांची जुनी पेंशन योजना बंद केली आहे. ती जुनी पेंशन योजना लागू करावी यासह सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, प्राथमिक शिक्षणाकरिता राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक नेत्यांनी समायोचित मार्गदर्शन केले.
आंदोलनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले. धरणे आंदोलनाला मुलचंद वाघाये, जयंत पटोले, देवराम थाटे, दिलीप ब्राम्हणकर, दुर्वास भड, किशोर ईश्वरकर, विलास टिचकुले, अविनाश शहारे, कोमल चव्हाण, अरुण बघेले, आदेश बांबोर्डे, रवी उगलमुगले, नरेंद्र रामटेके, रमेश फटे, महेंद्र लांजेवार, पी.डी. हातझाडे, बी.जी. भुते, संजय आजबले, यशपाल बगमारे, सोपान शेकडे, भास्कर अलोणे, सुधाकर घोल्लर, सुरेंद्र उके, जीवन काटेखाये, आशिष खंडाते, सुधीर माकडे, राम कांबळे, नरेंद्र गायधने, मुकुंद ठवकर, संदीप वहिले, दादाराव कागदे, बी.डी. दमाहे, अशोक चरडे, योगेश पुडके, नितीन रामटेके, मधू लेंडे, संतोष कारेमोरे, आर.आर. बन्सोड, वनवास धनिष्कार, संदीप खापर्डे, उमाकांत इंजूरे, विलास तिडके, शंभू घरडे, उषा कांबळे, नंदा शहारे, धरती बोरवार, माला नगरे, सोनाली मुडा, यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनिल निनावे यांनी केले.

Web Title: Retention of teachers for old pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.