थोकपेक्षा भाज्यांचे किरकोळ दर दुपटीने जास्त

By Admin | Updated: May 16, 2015 01:04 IST2015-05-16T01:04:16+5:302015-05-16T01:04:16+5:30

अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे.

The retail rate of vegetable is more than twice the bulk | थोकपेक्षा भाज्यांचे किरकोळ दर दुपटीने जास्त

थोकपेक्षा भाज्यांचे किरकोळ दर दुपटीने जास्त

भंडारा : अवकाळी पाऊस, सातत्याने ढगाळ वातावरण अशा स्थितीत ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असूनही भाव घसरल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. त्यातच किरकोळ बाजारात मात्र, तेजीत असल्याने ग्राहकांना खिशाला भुर्दंड बसत आहे.
साधारणत: एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हामुळे भाजीपाल्यांची आवक कमालीची मंदावते. त्यामुळे ठोक बाजारातही भाज्यांचे दर वाढून शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळतो. परंतु यावर्षी भाजीपाल्याची आवक कमी असतानाही बाजारात भाव पडले आहेत. परंतू किरकोळ बाजारात मात्र, याच भाज्या तिप्पट दारने विकल्या जात आहेत. ठोक बाजारात सध्या कांदा, बटाटा, टमाटर, वांगे, फुलकोबी, पत्ताकोबी, ढेमसे, सांभार, काकडी, भेंडी, गवार, गाजर आदी प्रमुख भाज्यांचे सरासरी दर ४०० ते १,००० रूपये प्रति क्विंटल आहेत. परंतू, याच भाज्यांचे किरकोळ दर मात्र, २० रूपयांपासून ६० रूपयांपर्यंत प्रति किलोवर गेले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The retail rate of vegetable is more than twice the bulk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.