शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

निवडणुकीचा असा निकाल अपेक्षित नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 2:54 PM

निवडणुकीचा निकाल असा येणे अजिबात अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांनी भंडारा येथे घेतली पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. शहरासह गावात जे वातावरण होते ते भाजपच्या विरोधात होते. विशेषत: शेतकरी, बेरोजगार युवक प्रचंड नाराज होते. अशा स्थितीत निवडणुकीचा निकाल असा येणे अजिबात अपेक्षित नव्हता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.निवडणुकीच्या निकालानंतर भंडारा येथे प्रथमच आयोजित पत्रकार परिषदेत खा. पटेल बोलत होते. ते म्हणाले, लोकसभेच्या निकालानंतर यावर नेमके काय बोलायचे याबाबत आम्ही सर्वच निरूत्तर आहोत. गावागावांतील वातावरण व राष्ट्रवादी पक्षासह मित्र पक्षांनी केलेल्या पाहणीदरम्यान जनमताचा कौल हा भाजपविरोधी होता. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे जेवढ्या फरकाने पराभूत झाले तेवढा आम्ही विचार केला नव्हता. विशेषत: तिरोडा व मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात मतांचे अंतर अचंबित करणारो आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर क्षेत्र वगळल्यास सर्वच ठिकाणी मतांचा कौल आमच्या बाजूने राहिल, असे सर्वेक्षणातून वाटत होते. याबाबत मी स्वत:ही पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीने सत्यता पडताळून पाहिली होती. परंतु हाती आलेला निकाल आम्हाला निरूत्तर करून गेला.ईव्हीएमबाबत बोलताना खासदार पटेल म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत आमचा आक्षेप नाही परंतु मागील दोन महिन्यात तब्बल तीनवेळा देशभरातील २२ राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र आमच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. भविष्यात निवडणुकीदरम्यान दुसरा पर्याय काय आहे, यावरही विश्लेषण व चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, नरेश डहारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल