पुरस्कार स्वीकारणाऱ्यांची जबाबदारी वाढते
By Admin | Updated: June 14, 2017 00:12 IST2017-06-14T00:12:53+5:302017-06-14T00:12:53+5:30
सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची शासनस्तरावर होणारी दखल ही त्यांच्या कार्याची पावती असते.

पुरस्कार स्वीकारणाऱ्यांची जबाबदारी वाढते
चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : मिलिंद रामटेके यांचा नागरी सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची शासनस्तरावर होणारी दखल ही त्यांच्या कार्याची पावती असते. मोबदला न घेता सेवा करणे म्हणजे पुण्याचे काम आहे. पुरस्काराने माणूस मोठा होत नाही. पण त्याने केलेल्या कार्याची पावती असते. पुरस्काराने समाजाच्या अपेक्षा वाढतात आणि जबाबदारीपण वाढते, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शासनाचा मानाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल वरठी येथील उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद रामटेके यांचा नागरी सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद तारिक कुरेशी, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे, वरठीचे सरपंच संजय मिरासे, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनोद भोयर, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष व माजी प्राचार्य श्रावण मते, सेवानिवृत्त प्राध्यापक विष्णुपंत चोपकर, किशोर राऊत, सोहेल शेख व गुलशन कोंडवणी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार वाघमारे आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारकर्ते मिलिंद रामटेके व त्यांच्या पत्नी बिंदू रामटेके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी यांनी, माणसाच्या सामाजिक कार्यात कोणताही पक्ष किंवा भेदभाव नसते असे सांगून मिलिंद रामटेके यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे उद्गार काढून त्यांच्या कार्यापासून इतरांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. यावेळी अरविंद कारेमोरे व डॉक्टर सेलचे डॉ.विनोद भोयर यांनी मार्गदर्शन केले. नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजक वसंत हुमने, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, घनश्याम बोन्द्रे, बाबू गजभिये, सिद्धार्थ मेश्राम, त्रिवेणी वासनिक, महादेव मते व श्रीराम खोब्रागडे आणि ग्राम पंचायत सदस्य निरंजना साठवने, संगीता सुखानी, नंदा सिरसाम, मनीषा मडामे, सुनीता बोन्द्रे, चेतन डांगरे, रवींद्र बोरकर व थारनोद डाकरे यांच्या वतीने मिलिंद रामटेके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संचालन भगीनदर बोरकर, यांनी केले. प्रास्ताविक व जीवन परिचय श्रावण मते यांनी केले. तर आभार श्रीकांत रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला राजेश रंगारी, मोनम रंगारी, प्रशांत रंगारी, राजेश रामटेके, त्रिवेणी उपवंशी, दिलीप उपवंशी, शशांक रामटेके, सिल्लू रामटेके, शारदा सिंग, विरेंद्र देशमुख, बंडु निंबाते, एकनाथ बांगरे, अनिल राऊत, प्रशांत रामटेके, विवेक गणवीर, किशोर बौद्ध, विद्या भिवंगडे, कैलास बन्सोड उपस्थित होते.