शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

पशुपक्षी प्रदर्शनीला प्रतिसाद

By admin | Updated: February 17, 2017 00:42 IST

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पवनी जिल्हा परिषद भंडारा तर्फे कोंढा येथे तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

कोंढा कोसरा : पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पवनी जिल्हा परिषद भंडारा तर्फे कोंढा येथे तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. त्यास शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.तालुकास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांनी केले. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती अर्चना वैद्य होत्या. मुख्य अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे होते. यावेळी सभापती पवनी कृषी उत्पन्न बाजार समिती लोमेश वैद्य, महानंदा मुंबईचे संचालक विलास काटेखाये, पवनी तालुका भाजपाध्यक्ष के. डी. मोटघरे, अल्का फुंडे, कल्पना गभने, गंगाधरराव जिभकाटे, अनिता तेलंग, शिला कुर्झेकर, डॉ. किशोर कुंभरे, डॉ. राजू शहारे, धनराज जांभुळकर, अमित जिभकाटे, ज्ञानदेव कुर्झेकर, अंबादास धारगावे, वामणराव जिभकाटे उपस्थित होते. खा. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करावे, राज्यातील व केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहे. त्याचा एक भाग म्हणून तालुकास्तरीय भव्यप्रदर्शनी प्रत्येक तालुक्यात भरविण्यात येत आहे. यावेळी पशुपक्षांचे पुरस्कार व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. यामध्ये देशी गाय : प्रथम पारितोषिक शालीकराम भांडारकर रा. पालोरा (चौ.), द्वितीय मोरेश्वर लिचडे कोंढा, तृतीय रविंद्र करंजेकर रा. अड्याळ, संकरीत गाय : प्रथम पारितोषिक मुरलीधर लिचडे रा. कोंढा, द्वितीय अमित जिभकाटे कोंढा, तृतीय अनिल लिचडे रा. कोंढा. म्हैस : प्रथम पारितोषिक मारोती नखाते रा. मोखारा, द्वितीय निखिल लिचडे रा. कोंढा, तृतीय हंसदास भिवगडे रा. कोंढा. ० ते ६ महिने संकरित कालवड : प्रथम मोरेश्वर काटेखाये रा. मोखारा, द्वितीय गोपाल तलमले मालची, तृतीय धनराज देशमुख रा. कोसरा. ०६ ते १२ महिने संकरीत कालवड : प्रथम अतुल बावणकर रा. कोंढा, द्वितीय नामदेव बावणकर कोंढा, तृतीय नारायण भुरे रा. कोंढा. ६ ते १२ महिने: प्रथम दौलत भिवगडे रा. कोंढा म्हशिच्या पारड्या, द्वितीय गोलू सेलोकर, तृतीय मोतीलाल लिमजे दाघेही रा. कोंढा, बैलजोडी गट : प्रथम राजहंस नागपुरे रा. पाथरी, द्वितीय भुपेश काटेखाये रा. चिचाळ, तृतीय मधूकर जिभकाटे रा. कोंढा, शेळी मेंढी (नर गट): प्रथम सुनिल बोरकर रा. कोंढा, (मादी गट) प्रथम संजय बन्सोड रा. भावड, द्वितीय देवानंद कळंबे रा. कोंढा, कुक्कुट पक्षी नर व मादी : प्रथम पांडुरंग भुजबळ रा. नेरला, द्वितीय सचिन कोरे रा. खैरी, तृतीय कैलास निपाने रा. अड्याळ असे बक्षीर शेतकऱ्यांनी मिळविले. त्यांना पाहुण्यांतर्फे रोख रक्कम, प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. एस. वाय. पाटील, डॉ. अरविंद ठाकरे, डॉ. सुभाष रेहपाडे, डॉ. गुणवंत भडके आणि पशुसंवर्धन विभागीय अधिकारी उपस्थित होते. संचालन व आभार डॉ. गिरीश गभणे यांनी केले. जागृती विद्यालय कोसरा, प्रियदर्शनी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थीनीनी नृत्य सादर केले. (वार्ताहर)