पवनीत कोरोना योद्धाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST2021-01-14T04:29:04+5:302021-01-14T04:29:04+5:30

कोंढा-कोसरा : कोविड योद्धा म्हणून पत्रकार असोसिएशन तालुका पवनीचे सचिव शाहिद अली यांचा सत्कार करण्यात आला. ...

Respect to Pavneet Corona Warrior | पवनीत कोरोना योद्धाचा सत्कार

पवनीत कोरोना योद्धाचा सत्कार

कोंढा-कोसरा : कोविड योद्धा म्हणून पत्रकार असोसिएशन तालुका पवनीचे सचिव शाहिद अली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.भागवत आकरे हे होते. अतिथी म्हणून भंडारा जिल्हा मच्छीमार उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पचारे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय जटाल, संघाचे उपाध्यक्ष चरणदास बावणे हे होते. सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला त्यांना व ‘लोकमत’चे वार्ताहर निश्चित मेश्राम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक व संचालन विलास गिरडकर यांनी केले. पत्रकार शाहीद अली यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली. आभार प्रदर्शन पत्रकार हरीश देशमुख यांनी केले, यावेळी राजेश एलशेट्टीवार, शरद देव्हाडे, चक्रधर मेश्राम, विशाल रंणदिवे, प्रा.चरणदास बावणे, धनंजय जटाल, प्रकाश पचारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Respect to Pavneet Corona Warrior