लोकाभिमुख सेवेचा संकल्प करा
By Admin | Updated: August 7, 2016 00:25 IST2016-08-07T00:25:37+5:302016-08-07T00:25:37+5:30
शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करू ...

लोकाभिमुख सेवेचा संकल्प करा
जयश्री पर्वते : परसोडी येथे महिला सक्षमीकरण सप्ताह
साकोली : शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करू असे आवाहन पंचायत समिती सदस्य जयश्री पर्वते यांनी परसोडी येथे तहसील कार्यालय साकोली व तलाठी कार्यालय परसोडी येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कल्पना उके, उपसरपंच मोतीराम कापगते, ग्रामसेवक कोचे, सदस्य दिलीप पर्वते उपस्थित होते. यावेळी तलाठी शिंदे म्हणाले, सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियाचा मालकीची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, वारस नोंदणी करताना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास नव्याने वारस नोंद घेणे, महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयी अर्जावर कार्यवाही करणे, महिला खातेदारांचा वहिवाट किंवा पांधन रस्त्या संदर्भात असलेल्या तक्रारीवरून कार्यवाही करणे, महिला बचतगटांना कर्जपुरवठा करण्यास विशेष मोहीम राबविणे, रोजगार हमी योजनेतील महिला जाबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, महिला सक्षमीकरण सप्ताहामध्ये कार्यक्रम द्यावयाचा आहे. असे सांगून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालन व आभार प्रदर्शन परसोडीचे तलाठी डी.एस. शिंदे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)