शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

आधारभूत धान खरेदी केंद्रांवरील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

प्रशासन व धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धान उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना शाखा लाखांदुरच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची पूतर्ता न झाल्यास शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांचे सामना करावा लागत आहे. प्रशासन व धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धान उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना शाखा लाखांदुरच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनामध्ये, आधारभूत धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध नसलेला बारदाना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, मिलर्सकडून खरेदी केंद्रांवर मोजनी झालेल्या धानाची उचल करून गोदाम मोकळे करून देण्यात यावे, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली लुट थांबविण्यात यावे, अवकाळी पावसामुळे कुजलेला धान खरेदी करणे, शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या धानाची मोजनी होत असलेला प्रकार थांबविण्यात यावे तसेच मोजनी झालेल्या धानाचे चुकारे गत दोन महिण्यापासून अडल्याने तात्काळ शेतकऱ्यांना चुकारे देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. १० दिवसाच्या आत मागण्यांची पुर्तता करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव एंचीलवार, पंचायत समिती उपसभापती शिवाजी देशकर, चक्रधर ठाकूर, आकाश दखने, अमित मिसार, जितेंद्र ढोरे, जयगोपाल लांडगे, वासुदेव बुराडे, श्रीकांत बोरकर, चंद्रशेखर खेडीकर, मंगेश राऊत, स्वप्निल ठेंगरी, शैंलेंद्र मोटघरे, पवन समरीत आदींचा समावेश होता.आंधळगाव येथे आधारभूत धान केंद्राचा शुभारंभमोहाडी : तालुक्यातील आंधळगाव येथील बारई राईस मिलमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन हरदोलीचे सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम बुराडे होते. यावेळी मोहाडी खरेदी विक्री समिती अध्यक्ष माधवराव बांते, खरेदी विक्री समिती सदस्य सुभाष गायधने, कोमल सरोदे, भोजराम शेंडे, लक्ष्मण कारेमोरे, राहुल वानखेडे, नशीब खाँ पठाण आदी उपस्थित होते. आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी व शासनाच्या बोनस योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच ढेंगे यांनी केले. धान खरेदी केंद्रासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी प्रयत्न केले. विधानसभा क्षेत्रात नव्याने धान खरेदी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले आहे. यामुळे आमदार कारेमोरे यांचे शेतकºयांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव बांते, तर आभार प्रदर्शन सुभाष गायधने यांनी केले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड