बघेडा जलाशयात पाण्याचा ठणठणाट

By Admin | Updated: September 23, 2016 00:38 IST2016-09-23T00:38:50+5:302016-09-23T00:38:50+5:30

तुमसर तालुक्यातील बघेड़ा जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे जलाशय अंतर्गत येणारे गावे बघेड़ा,

Resistance of water in Bheedda reservoir | बघेडा जलाशयात पाण्याचा ठणठणाट

बघेडा जलाशयात पाण्याचा ठणठणाट

समस्या दहा गावातील : पीक करपण्याची शक्यता, बावनथडीचे पाणी बघेड़ा जलाशयात सोडण्याची मागणी
तुलसीदास रावते पवनारा
तुमसर तालुक्यातील बघेड़ा जलाशयात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे जलाशय अंतर्गत येणारे गावे बघेड़ा, चिचोली, पवनारा, साखळी, मिटेवानी, दावेझरी, आंबागड़, मेहगांव, पिपरा, तुमसर येथील धान पिक संकटात आहेत. बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेड़ा जलाशयात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचा आधार बघेड़ा जलाशय १५७ एकर असून बघेड़ा, चिचोली, पवनारा, साखळी, मिटेवानी, दावेझरी, आंबागड़, मेंहगाव, पिपरा,तुमसर येथील शेतकऱ्यांचा १,६०० हेक्टर जमिनीला सिंचन दरवर्षी होत आहे. शेतकरी बघेडा जलशयावर निर्भर असतात. परंतु यावर्षी वरुणराजाने वाट लावल्यामुळे जलाशयात पाणी साठवणूक नाहीच्या बरोबर झाले आहे. आतापर्यंत जलाशय अंतर्गत एक ओलीत शेतकऱ्यांच्या पदरात पडले. परंतु पुन्हा सिंचनाची गरज आहे. जलशयात पाण्याचा तुडवडा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता व्याप्त आहेत. लागवडीला अफाट खर्च येतो, कर्ज घेऊन शेती सजविली व पाण्याअभावी पिक करपले तर कर्ज फेडावे कसे, लाखोचा फटका बसेल, या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडाली असून अनेक प्रश्न निर्माण झाले.
बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा जलाशयात उपलब्ध केले तर बघेडा जलाशय अंतर्गत परिसरातील गावातील शेतीना सिंचन होऊन पिक होण्याची खात्री आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा दुष्काळ नाकारता येणार नाही. याकडे संबधित विभागानी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याची गरज आहे.

Web Title: Resistance of water in Bheedda reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.