बदली धोरणाला शिक्षकांचा विरोध
By Admin | Updated: May 21, 2017 00:19 IST2017-05-21T00:19:45+5:302017-05-21T00:19:45+5:30
राज्य शासनाने २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर केलेल्या शिक्षकांच्या नवीन बदली धोरणास विरोध ....

बदली धोरणाला शिक्षकांचा विरोध
शेकडो शिक्षक रवाना : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर केलेल्या शिक्षकांच्या नवीन बदली धोरणास विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने २२ मे सोमवार रोजी दुपारी १ वाजता शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी भंडारा जिल्ह्यातून शेकडो शिक्षक जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी दिली.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी रोजी शिक्षकांच्या बदल्याबाबत नवीन बदली धोरण जाहीर केले तेव्हा पासून राज्यातील शिक्षकात असंतोष निर्मान झाला आहे. या नवीन शासन निर्णयात व जुन्या दि. १५ मे २०१४ च्या शासन निर्णयात मोठी तफावत आहे. जुन्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय बदल्या फक्त तालुक्यातील तालुक्यात पंचायत समिती स्तरावर १० टक्के व विनंती ५ टक्के होत असत तसेच जिल्हा स्तरावर फक्त विनंतीच्या ५ टक्के बदल्या होत असायच्या त्या मुळे शिक्षकांची फारशी गैरसोय होत नसे. एकदा शाळेवर बदली झाल्यावर ५ वर्षे त्या शिक्षकांची इतरत्र कोणत्याही कारणामुळे बदली होत नसल्यामुळे त्यांना ५ वर्षे स्थिरता असायची तसेच बदल्यांना टक्केवारी असल्यामुळे मयार्दा होती मात्र नवीन बदली धोरणात तालुका स्तरावरील बदली प्रक्रिया रद्द केली असून सर्व बदल्या या जिल्हास्तरावरून होणार आहेत. बदल्या करताना जिल्ह्यात दोन क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच इतर प्रश्नामुळे शिक्षक ग्रस्त झाला असून त्यात १ नोवेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरावर पाठपुरावा करूनही अद्याप पर्यत या प्रश्नाची शासनाने दाखल घेतलेली नाही. अंतर जिल्हा बदली प्रकरणा बाबत भूमिका स्पष्ट नसल्यामुळे यापूर्वी शिक्षकांनी जे प्रस्ताव दिले त्या प्रस्तावाला कचराकुंडी दाखवली पुन्हा दुसऱ्यांदा आॅनलाईन माहिती भरावयास लावून त्यांच्या त्रासात भर घातली आहे. सध्या सर्व शिक्षकांनी संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेले असतानाही त्यांची वेतनवाढ थांबवून वेतन वाढीची वसुली चालू केली आहे. ती वसुली थांबवावी तसेच पदवी प्राप्त शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून भाषा, विज्ञान, समाजशास्त्र या विषयावर पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक दिलेली असताना त्यांना पदवीधर शिक्षकाची वेतन श्रेणी देण्यात आलेली नाही ती देण्यात यावी अशी मागणी आहे. मोर्चात भंडारा जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, सुधिर वाघमारे, राजेश सुर्यवंशी, राजु सिंगनजुडे, एन.डी. शिवरकर, दिलीप बावणकर, विकास गायधने, राजन सव्वालाखे, राधेशाम आमकर व विनायक मोथरकर व सुरेश हर्षे, संजिव बावणकर, अनिल गयगये, राकेश चिचामे, श्रावण हजारे, युवराज वनवे, रजनी करंजेकर,भैय्या देशमुख, नामदेव गभने, दिनेश घोडीचोर, संध्या गिहेर्पुंजे, योगेश कुटे, यामिनी गिहेर्पुंजे, प्रकाश चाचेरे, नरेश देशमुख, माधव पोले, हितेश उईके, महेश गावंडे, गौरीशंकर वासनिक, रामप्रसाद वाघ, मकरंद घुगे,केसर मासुरकर, दिनेश खोब्रागडे, के.डी.भुरे, सुरेश लंजे, एकनाथ सुखदेवे, विजय भुरे, अरविंद रामटेके, चंद्रप्रकाश हलमारे, महागन हटवार, रमेश लोणारे, शिवानंद नालबंध, फारुख शाह, कमलजीतसिंग राठोड, जयसिंग राठोड, गुंडाजी सलगर, सचिन खटके, लोमेश कोल्हे, विजया भगत आदी सहभागी होत आहेत.