शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बावनथडी धरणाचा जलसाठा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:07 AM

तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.

ठळक मुद्देचार टक्के जिवंत साठा : धरण क्षेत्रात पावसाची कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी धरणात बुधवारपर्यंत केवळ चार टक्के जिवंत पाणी साठ्याची साठवणूक झाली. मृत साठ्यातून जिवंत पाणी साठ्याकडे वाटचाल सुरु झाली. मध्यप्रदेशात पाऊस बरसल्याने धरणात पाणी साठा वाढणे सुरु आहे. सिंचनाकरिता किमान धरण साठ टक्के भरण्याची तांत्रिकदृष्ट्या गरज आहे.तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. तुमसर, मोहाडी तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय सदर धरणामुळे होते. सुमारे १२ हजार ५०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर दोन्ही राज्याचे खर्च केला आहे. पावसाची सरासरी कमी असल्याने धरणात मृतसाठा शिल्लक होता. सिंचनाकरिता किमान साठ टक्के धरण भरणे आवश्यक आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.पाणीटंचाईची शक्यताधरण भरल्यानंतर सिंचनाची सुविधा होते. परंतु यावर्षी धरण भरण्यासंदर्भात शंका उपस्थित होत आहे. बावनथडी धरणात जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाल्यावर विहिरींची पाणी पातळीत वाढ होते. पाणी पातळीत वाढ न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.पिकाला धोकाबावनथडी प्रकल्पातून शेतीकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. धरण न आल्यास सिंचनाकरिता पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे पिकांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या धरण भरण्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.बावनथडी धरणाची वाटचाल जिवंत साठ्याकडे सुरु झाली आहे. बुधवारपर्यंत जिवंत पाणी साठा चार टक्के झाला आहे, धरणास किमान ६० ते ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला तर सिंचनाकरिता पाण्याचा विसर्ग करता येतो.-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प