राखीव जंगल महामंडळाला सुपूर्द
By Admin | Updated: July 5, 2014 00:16 IST2014-07-05T00:16:36+5:302014-07-05T00:16:36+5:30
भंंडारा वन विभाागातील •भंंडारा, अड्याळ, पवनी, लाखांदूर, तुमसर, लेंडेझरी, जांब/कांद्री, नाकाडोंगरी...

राखीव जंगल महामंडळाला सुपूर्द
भंडारा : भंंडारा वन विभाागातील •भंंडारा, अड्याळ, पवनी, लाखांदूर, तुमसर, लेंडेझरी, जांब/कांद्री, नाकाडोंगरी या वनक्षेत्रातील सुमारे २० हजार हेक्टर जंगल वन विकास महामंडळाला सुपुर्द करण्यात येणार आहे. या हस्तांतरणाला जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. या निर्णयामुळे येथील वन कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
•भंडारा वन विभाागातील •भंंडारा वनक्षेत्रातील ७३१.१७३ हेक्टर, अड्याळ ७८७.९२३ हेक्टर, पवनी ३५८०.८६२ हेक्टर, लाखांदूर १७२६.०८ हेक्टर, तुमसर १६३४.१६० हेक्टर, लेंडेझरी ४२१७.४२२ हेक्टर, जांब/कांद्री ६३५२.३५७ हेक्टर, नाकाडोंगरी १५४७.६०३ हेक्टर असे २० हजार २१.०९१ हेक्टर राखीव जंगल वन विकास महामंडळाला सुपुर्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे या क्षेत्रातील वन संवर्धन व वनसंरक्षण करणारे वन कर्मचारी, वनपाल, वनरक्षक व वनमजुरांची पदे कमी होणार आहेत. वरिष्ठ पातळीवर फक्त वनपाल, वनरक्षक व स्थायी वनमजुरांनाच अन्य वनक्षेत्रात व इतर वन विभागात समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, मागील २० ते २५ वर्षांपासून रोजंदारीवर वन संवर्धन व वन संरक्षणाची कामे करीत असलेल्या वनकामगारांची कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वनमजुरांची संख्या सुमारे दीडशे ते २०० आहे.
वन विभागाचे घनदाट व राखील जंगल वन विकास महामंडळाकडे सुपुर्द केल्याने वन विभागाकडे आता फक्त संरक्षित जंगल व झुडपी जंगल तेवढे उरले आहे. नैसर्गिक असलेले ०.४ घनतेचे दाट जंगलाची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनतीने संवर्धन व संरक्षण करून वाचविले आहे. आता वन विकास महामंडळाकडून या जंगलाची कटाई करून नवीन रोपवन लागवड करण्याची कामे होणार आहेत. त्यामुळे पर्यावरण व प्रदुषणाचा निकष डावलला जात असून वनकर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिष्टमंडळात जे.एम.नंदूरकर, ईर्शाद सय्यद, संपतराव खोब्रागडे, राजू झंझाड आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)