लाखनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
By Admin | Updated: June 15, 2015 00:33 IST2015-06-15T00:33:34+5:302015-06-15T00:33:34+5:30
लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी लाखनी तहसील कार्यालयात रविवारला सोड...

लाखनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
निवडणूक : आरक्षण २०१५-२०२० या कालावधीकरिता
लाखनी / सालेभाटा : लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी लाखनी तहसील कार्यालयात रविवारला सोडत पद्धतीने आरक्षण घोषित करण्यात आले. सन २०१५-२०२० या कालावधीकरिता राहतील.
तालुक्यात ३६ महिला सरपंचपदी विराजमान होणार आहे. आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जाती १३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १९, अनुसूचित जमाती ५ व सर्वसाधारण ३४ असे एकूण ७१ स्त्री पुरुष सरपंचपदाचे आरक्षणामुळे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती स्त्री राखीव ७, अनुसूचित जमाती स्त्री राखीव ३, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव १० तर सर्वसाधारण स्त्री राखीव १७ याप्रमाणे सरपंचपद आरक्षित करण्यात आले.
सरपंचपदाचे गाव निहाय आरक्षण अनुसूचित जाती स्त्री राखीव मुरमाडी सावरी, किटाडी, लाखोरी, लोहारा, रेंगेपार कोहळी, रेंगेपार कोठा, झरप, अनुसूचित जाती स्त्री पोहरा, केसलवाडा वाघ, पिंपळगाव सडक, नामाप्र स्त्री राखीव गुरठा, रामपुरी, मोरगाव, सालेभाटा, चान्ना, दिघोरी, सावरी, कोलारी, खुनारी, सिपेवाडा तर सर्वसाधारण स्त्री राखीवसाठी किन्ही डोंगरगाव न्या, राजेगाव, गोंडसावरी, गोंडेगाव, मोगरा, कन्हाळगाव, देवरी, गोंडी, खराशी, मचारणा, रेंगोळा, घोडेझरी, मऱ्हेगाव, शिवनी, भूगाव आणि ईसापूर तर अनुसूचित जाती, पालांदूर (चौ.) पेंढरी, कनेरी दगडी, सोमलवाडा, लोहारा, खेडेपार, कवलेवाा, अनुसूचित जमाती, गडेगाव, मिरेगाव, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दैतमांगली, आलेसूर, मांगली बांध, परसोडी, सोमनाळा, गराडा, मानेगाव, सडक, बोरगाव, पळसगाव, सर्वसाधारण करिता केसलवाडा पवार, धाबेटेकडी, निलागोंदी, सिंदीपार, सामेवाडा, डोंगरगाव सासर, मासलमेटा, मुरमाडी तुप, मेंढा, शेळी, जेवनाळा, सेलोटी, वाकल, पाथरी, धानला, खैरी, निमगाव व विहिरगाव या प्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले.
आरक्षण सोडत चौदा वर्षीय सचिन बरर्गे यांचे हस्ते काढण्यात आले. तहसीलदार बांबोर्डे, नायब तहसीलदार एस.ए. घारगडे, मंडळ अधिकारी एम.एस. गोटेफोडे, एस.सी. धुर्वे, न्यायमूर्ती, गेडाम यांचे प्रमुख उपस्थितीत आरक्षणाची घोषणा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)