विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

By Admin | Updated: December 6, 2014 01:04 IST2014-12-06T01:04:04+5:302014-12-06T01:04:04+5:30

भारतीय मजदूर संघ जिल्हा भंडारा यांचे वतीने तहसीलदार भंडारा यांना कृषी ग्रामीण मजदूरांच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले.

Request for tahsildars of various demands | विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

भंडारा : भारतीय मजदूर संघ जिल्हा भंडारा यांचे वतीने तहसीलदार भंडारा यांना कृषी ग्रामीण मजदूरांच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, सर्व योजनेचा लाभ नागरिकांना मिळण्याकरिता व लाभार्थी वंचित राहू नये याकरिता सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता श्रमीक संगठनांना संबंधित योजनेत भागीदार बनविण्यात यावे, अत्यंत महत्वाची व आवश्यक मागणी असुन शुध्द पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. सर्व खेडे गावांत शुध्द पाणी पुरवठा व्हावा.
सर्व पंचायत समिती आरोग्य दवाखान्यात डॉक्टर व इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे. वर्ग १२ वी पर्यंत तालुका स्तरावरच्या शाळेत व त्या अंतर्गत शाळेत नि:शुल्क व अन्य सामग्री सहित विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावे. तसेच रोजगार भिमुख शिक्षण खेड्यातून नि:शुल्क देण्यात यावे. ग्रामीण स्तरावर शेतीतून होणाऱ्या उत्पन्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीतून खरेदी करण्याच्या सोई उपलब्ध व्हाव्या, संबंधित कायदयात दुरुस्ती होऊन २०० दिवसाचे काम उपलब्ध करुन देण्यात यावे.
सर्व प्रकारच्या ग्रामीण मजदूरांना मनरेगा, आशाकर्मी, शिक्षामित्र, शेतकरी मित्र, अंगणवाडी, शेतमजूर, रोजगारसेवक, विटाभट्टी आदी ग्रामीण मजदूरांना किमान १०,००० रूपये वेतन देण्यात यावे., ग्रामीण मजदूरी करणाऱ्या कारागिरांना उत्कृष्ट सेवाच्या आधारावर किमान वेतन ठरविण्यात यावे. वरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार सी. टी. तेलंग यांचे मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले. निवेदन देताना भंडारा भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष गजानन कावळे, बोहटे, मनोहर हेडाऊ, प्रदीप किटे, दिपक डहारे यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Request for tahsildars of various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.