मराठी पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: April 27, 2016 00:31 IST2016-04-27T00:31:45+5:302016-04-27T00:31:45+5:30

जाहिरात दरवाढ, पत्रकार पेंशन योजना, पत्रकार संरक्षण कायदा व वेतन आयोगाच्या अंमलबजावणी व पत्रकारांच्या इतर न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भात ....

Representation to the Chief Minister of the Marathi press association | मराठी पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मराठी पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भंडारा : जाहिरात दरवाढ, पत्रकार पेंशन योजना, पत्रकार संरक्षण कायदा व वेतन आयोगाच्या अंमलबजावणी व पत्रकारांच्या इतर न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भात भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारला दुपारी १२ वाजता माहिती अधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील पत्रकारांच्या मागण्या गेली अनेक वषार्पासून प्रलंबित आहेत. पत्रकार पेंशन आणि संरक्षण कायद्याचा विषय नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिवेशनात त्यासंबधीचा निर्णय झाला नाही. छोटी आणि मध्यम वृत्तपत्रे जगली पाहिजेत ही सरकारची भूमिका असायला हवी. पण दुदेर्वाने आपल्या सरकारची भूमिका छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या विरोधात आहे की काय? अशी शंका येते. सरकारकडून ज्या जाहिराती दिल्या जातात त्यात सुसुत्रता नाही.
जाहिरातींची संख्या, आकार कमी केलेला आहे. सरकारच्या याच धोरणामुळे अन्य श्रेणीतील वृत्तपत्रासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज अनेक जिल्हा दैनिके व साप्ताहिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबरोबरच भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उर्वरीत निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा, या सर्व प्रश्नांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. यासर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघाच्या वतीने देण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी स्वीकारले.
यावेळी पत्रकार संघाचे चेतन भैरम, मिलींद हळवे, डी.एफ.कोचे, इंद्रपाल कटकवार, तथागत मेश्राम, चंद्रकांत श्रीकोंडवार, सुरेश कोंटागले, नितिन कारेमोरे, विजय क्षिरसागर, ललित बाच्छिल, जयकृष्ण बावणकुळे, हिवराज उके, चंदू शहारे, राकेश चेटूले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Representation to the Chief Minister of the Marathi press association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.