पर्यटनातून रोजगार वाढीसाठी रस्त्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:15+5:302021-04-06T04:34:15+5:30
युवराज गोमासे करडी (पालोरा): कोका अभयारण्याच्या निर्मितीनंतर क्षेत्रातील पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहेत. ...

पर्यटनातून रोजगार वाढीसाठी रस्त्याची दुरुस्ती करा
युवराज गोमासे
करडी (पालोरा): कोका अभयारण्याच्या निर्मितीनंतर क्षेत्रातील पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहेत. पर्यटकांवर अनेकांच्या उपजीविका अवलंबून आहेत. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटन विकासाला खिळ बसली आहे. रस्त्याची दुरूस्ती करून विकासाला चालना देण्याची मागणी होत आहे.
कोका अभयारण्यातील जंगल सफारी सुरूवात झाली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी जंगल सफारीचा व निसर्ग पर्यटनाचा आनंद उपभोगला आहे. आता पानगळ झाली असल्याने दूरवर वन्यजीव दृष्टीस पडत आहे. त्यामुळे शहरातील पर्यटकांचा ओढा वाढीस लागला आहे. तणावमुक्तीसाठी व कंटाळा दूर करण्यासाठी शहरातील नागरिक मोठ्या हौसेने कुटुंबासह जंगल सफारीला कोका अभयारण्यात येतात. परंतु पलाडी मार्गे कोका
अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना खडतर रस्त्यांचा सामना करावा लागतो आहे. परिणामी जंगल सफारीवर येणाऱ्या पर्यटकात कमालीचा असंतोष व्यक्त होत आहे.
अभयारण्यात टेकेपार गेटपासून चंद्रपूर अगोदरच्या रेंगेपार फाट्यापर्यंत सुमारे ७ ते ८ किमी अंतरापर्यंतचा रस्ता कमालीचा उखडला आहे. बीबीएमचे सालपटे निघाले
असून वाहनांचे नुकसान होत आहेत.
वाहन पंचर होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. या प्रवासात कुठेही वाहने दुरूस्तीचे दुकाने नसल्याने अडचणीत वाढ झालेली आहे. कोका अभयारण्यातील जैवविविधता व निसर्गसौंदर्य तसेच वन्यजीवांची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेत भर पडण्यासाठी तत्काळ रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे.
पर्यटन विकासाला ‘खड्ड्यांचा’ अडथळा
कोका अभयारण्याच्या पर्यटन विकासाला रस्त्यांवरील खड्ड्यांचा अडथळा घातक ठरू पाहत आहे. पलाडी-टेकेपार-चंद्रपूर ते कोका मुख्य रस्त्याचे तीन ते चार किमी पर्यंतचे सालपटे निघाले आहेत. खड्ड्यांमुळे चंद्रपूर येथे जंगल सफारीला येणाऱ्या पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्याच्या अवदशेमुळे सफारीपूर्वीच पर्यटकांना थकवा जाणवतो. बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष असून तत्काळ रस्ता दुरूस्तीची मागणी माजी जि.प. सदस्य उत्तम कळपाते, प्रभुजी फेंडर, हितेश सेलोकर, माजी पं. स. सदस्य नितू सेलोकर, सुजाता फेंडर यांनी केली आहे.