वैनगंगा नदीचे पूल ते जवाहर गेटपर्यंतचा रस्त्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:16+5:302021-07-24T04:21:16+5:30
राज्य महामार्गाला दर्जोन्नत करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या महामार्गावरील काही रस्ता जंगलव्याप्त क्षेत्रात असल्याने ...

वैनगंगा नदीचे पूल ते जवाहर गेटपर्यंतचा रस्त्याची दुरुस्ती करा
राज्य महामार्गाला दर्जोन्नत करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. या महामार्गावरील काही रस्ता जंगलव्याप्त क्षेत्रात असल्याने वनविभागाचे मंजुरीसाठी काम असलेला आहे. काही ठिकाणी एक बाजूस काम झाले, दुसरी बाजू तशीच पडून आहे. पवनीलगत असलेला वैनगंगा नदीचे पूल ते जवाहर गेटपर्यंतचा रस्ता अर्धवट बांधकाम झालेला असल्याने जीवघेणा ठरत आहे. पवनीतील कित्येक अपघात रस्त्याच्या याच भागात झालेले आहेत. या रस्त्यावरून सायकल, मोटारसायकल, कार, बस, ट्रक, टिप्पर,बैलगाडी असे लहान मोठे कोणतेही वाहन सरसकट चालवता येत नाही. नियमितपणे रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक मणक्याचे आजाराने ग्रस्त झालेले आहेत. काही गंभीर जखमी झाले तर काहींनी जगाचा निरोप घेतला. राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या यंत्रणेने रस्ता बांधकामाकडे लक्ष वेधून तत्परतेने रस्त्याचे निर्माण कार्य पूर्ण करावे, व नागरिकांना जीवघेणा प्रवासापासून मुक्त करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.