डोंगरी ते गोबरवाही रस्त्याच्या रुंदीकरणासह तातडीने दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:49+5:302021-02-23T04:53:49+5:30

जांब (लोहारा ) - तुमसर तालुक्यातील डोंगरी बु.हे मॅग्नीज खानीसाठी प्रसिद्ध असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहणाची ये-जा ...

Repair the hill to Gobarwahi road with widening immediately | डोंगरी ते गोबरवाही रस्त्याच्या रुंदीकरणासह तातडीने दुरुस्ती करा

डोंगरी ते गोबरवाही रस्त्याच्या रुंदीकरणासह तातडीने दुरुस्ती करा

जांब (लोहारा ) - तुमसर तालुक्यातील डोंगरी बु.हे मॅग्नीज खानीसाठी प्रसिद्ध असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहणाची ये-जा व नागरिकांची वर्दळ डोंगरी बु. गोबरबाही या रस्त्याने असल्याने हा रस्ता ठिकठिकाणी उखाळला असून, रस्त्यावर फार खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना

आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागल्याने कमालीचा त्रास होत आहे . त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने डोंगरी बु. ते गोबरवाही या रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जि.प.सदस्य संदीप ताले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे . डोंगरी बु.हे परिसरातील मोठे गाव असून येथे मॉईन असल्यामुळे नागरिकांना रोजगारासह बँकेत व विविध प्रकारच्या कामासाठी या

परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपल्या दैनंदिन व विविध कामासाठी डोंगरी बु. गोबरबाही या रस्त्याने नेहमीच जावे लागतो, मात्र हा रस्ता अरुंद असून पूर्णत; उखळल्याने धोकादायक झाल्यामुळे बहुतांशी अपघाताच्या घटना घडल्याने नागरिकांनी याचा धसका घेतला आहे. डोंगरी बु.गोबरबाही रस्ता हा अरुंद व उखळल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली असूनसुद्धा याकडे बाधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. डोंगरी बु.येथे मॉइन असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात मालवाहक वाहनाची वाहतूक या मार्गाने सुरू असते, त्यामुळे मॉइन प्रशासनाने सीएसआर योजनेंतर्गत सदर रस्त्याची रुंदीकरणासह मजबूत बाधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचीही गरज आहे; मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांना जीव मुठीतच घेऊन प्रवास करावा लागतो, त्यामुळे संबंधित विभागाने डोंगरी बु. गोबरवाही रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जि.प.सदस्य संदीप ताले यांनी प्रशासनाला केली आहे .

Web Title: Repair the hill to Gobarwahi road with widening immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.