राष्ट्रीय महामार्ग ते शारदा चौकपर्यंत रस्ता नव्याने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:33+5:302021-03-14T04:31:33+5:30

१३लोक१४ साकोली : सध्या साकोली येथे नगर परिषदतर्फे विकास कामाचा धुमधडाका सुरू असला तरी नगर परिषदेतर्फे राष्ट्रीय महामार्ग ते ...

Renew the road from National Highway to Sharda Chowk | राष्ट्रीय महामार्ग ते शारदा चौकपर्यंत रस्ता नव्याने करा

राष्ट्रीय महामार्ग ते शारदा चौकपर्यंत रस्ता नव्याने करा

१३लोक१४

साकोली : सध्या साकोली येथे नगर परिषदतर्फे विकास कामाचा धुमधडाका सुरू असला तरी नगर परिषदेतर्फे राष्ट्रीय महामार्ग ते शारदा चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या या रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे की या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा तत्काळ नव्याने बनविण्यात यावे, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव प्रभाकर सपाटे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना दिले आहे.

या निवेदनानुसार राष्ट्रीय महामार्ग ते शारदा चौकापर्यंतच रस्ता ठिकठिणाहून उखडला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालाविताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरील अपघाताची शक्यता बळावली असून नागरिकांची अडचण दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र या अडचणींकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे. नगर परिषदेने तत्काळ हा रस्ता नव्याने करावा, अशी मागणी सपाटे यांनी केली आहे.

Web Title: Renew the road from National Highway to Sharda Chowk