शिधापत्रिका निकाली काढा
By Admin | Updated: July 9, 2014 23:17 IST2014-07-09T23:17:53+5:302014-07-09T23:17:53+5:30
साकोली तहसील कार्यालयात अनेक नागरिकांनी नवीन शिधापत्रिका तयार करावे, संयुक्त शिधापत्रिकेतून वेगळी शिधापत्रिका नव्याने तयार करण्यात यावे, याकरीता ज्यांच्याजवळ शिधापत्रिका नाही

शिधापत्रिका निकाली काढा
तहसीलदारांना घेराव : अन्यथा भीक मांगो आंदोलन करणार, किसान गर्जनेचा इशारा
गोंडउमरी : साकोली तहसील कार्यालयात अनेक नागरिकांनी नवीन शिधापत्रिका तयार करावे, संयुक्त शिधापत्रिकेतून वेगळी शिधापत्रिका नव्याने तयार करण्यात यावे, याकरीता ज्यांच्याजवळ शिधापत्रिका नाही अशा नागरिकांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी अर्ज सादर केले. परंतु सदर प्रकरणे निकाली काढण्यात आले नाही. परीणामी सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रकरणे निकाली काढावे, अशी मागणी रामरतन चांदेवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अन्न पुरवठा विभागात वारंवार विचारणा करुनही नागरिकांना आजपर्यंत शिधापत्रिका मिळाल्या नाहीत. साकोली तालुक्यातील ६५ गावातील नागरिकांनी ५०० ते ६०० रुपये खर्च करून अर्ज केले. परंतु त्या अर्जावर कारवाई झाली नाही. शिधापत्रिकांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावी, याकरीता किसान गर्जनाचे जिल्हामंत्री रामरतन चांदेवार यांच्या नेतृत्वात अनेक अन्यायग्रस्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार यांना घेराव घातला.शिधापत्रिका व इतर मागण्यांकरीता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदर समस्यांवर गंभीर होऊन प्रशासनाने पाऊले उचलून राशन कार्डची प्रकरणे निकाली काढावे, अन्यथा भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी राजू बावनकुळे, विलास पगाडे, लेखराज बांगडकर, बेनिराम राऊत, साधू कांबळे, अमरशी चांदेवार, विलास वाढई, अमरशी कांबळे, चांदेवार, शंकर कापगते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)