चितापूरवासीयांची समस्या दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:07 IST2019-07-18T23:06:58+5:302019-07-18T23:07:13+5:30
तालुक्यातील चितापूरवासीयांना कोब्रा बटालियनतर्फे जलकुंभाला लावलेले तारेचे कुंपन काढून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

चितापूरवासीयांची समस्या दूर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील चितापूरवासीयांना कोब्रा बटालियनतर्फे जलकुंभाला लावलेले तारेचे कुंपन काढून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, कार्यकारी अभियंता यांच्यासह अधिकारी, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, माजी सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते उपस्थित होते.
चितापूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्षापुर्वी जलकुंभ तयार करण्यात आले. या जलकुंभाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध होत होते. मात्र कोब्रा बटालियनच्या कर्मचाºयांनी त्या जलकुंभाला काटेरी तार गुंडाळले. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. लगतच असलेल्या तलावात जाण्यासाठी रस्ता देखील बंद करण्यात आला. याकरिता जलकुंभाला गुंडाळलेले तार काढून येथील नागरिकांना आवागमनाची व्यवस्था करण्यात यावी, तलावात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा चितापूर वासीयांनी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला होता.
या प्रकाराची पालकमंत्र्यांनी दखल घेवून चितापूरवासीयांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. त्यामुळे चितापूरवासीयांना तारेच्या कुपंनाचा मार्ग मोकळा करण्याची प्रक्रीयेची प्रतीक्षा आहे. यानिर्णयाचे चितापूर ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.