शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर येथे पैनगंगेच्या काठावर खोदकामात सापडले पुरातन मंदीराचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 18:21 IST

Mehkar News : पैनगंगेच्या काठावर खोदकामात पुरातन मंदीराचे अवशेष सापडले.

- ओमप्रकाश देवकर

मेहकरः काळ्या पाशानातील शारंगधर बालाजींच्या आशियाखंडातील सर्वात आकर्षक व उंच मुर्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या मेहकर शहरालगत वाहनाऱ्या पैनगंगा नदी लगतच्या शेतात खोदकामा दरम्यान पुरातन हेमाडपंथी मंदिराचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान या पुरातन अवशेषामुळे मेहकर शहराच्या आणखी जुना इतिहास उजागर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.ना. घ. देशपांडेंच्या शिळ कवितेसह दंतकथेसाठी मोठे खाद्य राहिलेल्या कंचनिच्या महालामुळे मेहकर शहर प्रसिद्ध आहे. अशा या मेहकर शहरालगत जानेफळ मार्गावर असलेल्या नदीच्या अनिकटाजवळील शेतात पुरातन मंदिराचे हे अवशेष सापडल्यामुळे त्याचे कुतुहल निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथे पोलिस बंदोस्त लावण्यात येऊन गर्दी हटविण्यात आली. दरम्यान या घटनेचे गांभिर्य पाहता तहसिलदार डॉ. संजय गरकळ यांनी पुरातत्व विभागास याची माहिती देत छायाचित्र पाठविले आहेत. त्यानंतर पुरातत्व विभागाच्या आदेशानंतर येथील खोदकाम बंद करण्यात आले आहे.

मेहकर लगतच्या फैजलापूर शिवारात पूर्वी पैनगंगा नदी वाहत असे. कालातंराने याच शिवारात या नदीने मार्ग बदलल्याने नदीचा प्रवाह काही अंतरावरुन दुसऱ्या मार्गाने गेलेला आहे. या जुन्या ठिकाणी मोठा नाला आहे. हा नाला अनिल इंगळे यांच्या फैजलापूर शिवारातील शेतालगत वाहतो. पाणी जाण्यासाठी या नाल्याचे खोदकाम सुरु असताना या नाल्यात गुरुवारी २० फुट खोदल्यानंतर एक नंदी, मुर्तीचे भग्न अवशेष व मंदीराचे दगड आढळून आले आहेत. पैनगंगा नदीला आलेल्या एखाद्या मोठ्या पुरात हे मंदीर गाळामध्ये दबले असावे असा कयास आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसिलाद संजय गरकल यांनी घटनास्थलाला भेट दिली. त्यांच्या समवेस नायब तहसिलदार अजय पिंपरकर, तलाठी गायकवाड उपस्थित होते.

--पुरातन शिवमंदीर असण्याची शक्यता--

या ठिकाणी पुरातन शिवमंदीर असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे. सोबतच काळाच्या अेाघात हे मदीर पडले असावे येथे विखूरलेल्या अवस्थेतील दगडावरून तथा मंदीराच्या खांबावरून दिसते. या पुरातन अवशेषामध्ये वास्तूच्या पायऱ्याही आढळून आल्या आहेत. शिवाय सापडलेल्या नंदी चे दोन्हीही शिंगे मोडलेल्या अवस्थेत आहेत. एक मूर्ती सापडलेली आहे ती सुध्दा भग्न अवस्थेत आहे.

--शारंगधर बालाजींची मुर्तीही सापडली होती--

मेहकर येथे सध्या उभारण्यात आलेल्या शारंगधर बालाजीची मुर्तीही पैनगंगा नदीच्या काठालगत जमीनीत लाकडाच्या भुशामध्ये सुरक्षीतरित्या ठेवलेली १८८८ दरम्यान आढळून आली होती. त्यानंतर या मुर्तीची प्रतिष्ठापणा स्थानिकांनी केली होती. त्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आता सापडलेले मंदीराचे अवशेषही मेहकर शहराच्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकणारे असू शकतात असा कयास व्यक्त केला जात आहेे.

--पुरातत्व विभाग सक्रीय--

मेहकमध्ये पुरातन मंदीराचे अवशेष सापडल्यानंतर पुरातत्व विभागही सक्रीय झाला आहे. सोमवारी नागपूर येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक मेहकर येथे येऊन या अवशेषांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे ते यासंदर्भात नेमके काय सांगतात याबाबत उत्सूकता लागून आहे.

टॅग्स :MehkarमेहकरbuldhanaबुलडाणाArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण