निराधारांची प्रलंबित प्रकरणे निकाली
By Admin | Updated: May 23, 2015 01:15 IST2015-05-23T01:15:13+5:302015-05-23T01:15:13+5:30
अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे निराधारांची २०२ प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्याचा विक्रम तहसिलदार मडावी यांनी केला.

निराधारांची प्रलंबित प्रकरणे निकाली
मोहाडी : अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे निराधारांची २०२ प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्याचा विक्रम तहसिलदार मडावी यांनी केला.
शासनाच्या पेन्शन योजनेत समाविष्ठ असणाऱ्या योजनेची प्रकरणे अडली होती. संजय गांधी निराधार समितीचे गठन झाले नाही. तसेच उपविभागीय अधिकारी यांना कामामुळे न मिळणारा वेळ यामुळे अनेक दिवसापासून निराधारांची प्रकरणे बंद फाईलीत पडून होती. अशातच महाराष्ट्र शासनाने ज्या ठिकाणी समित्यांचे गठन नाही अशा ठिकाणच्या तहसिलदारांनी निराधारांची प्रकरणे मंजूर करावे, असे आदेश काढले. तहसिलदार मडावी यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. कपाटातून प्रकरणे तहसिलदाराच्या टेबलवर आले.
व्यस्त कामातून वेळ काढून तहसीलदार मडावी यांनी श्रावणबाळ योजनेच्या ९० प्रकरणे, संजय गांधी निराधार योजनेची ६०, इंदिरा गांधी योजनेतील विधवांची २५ प्रकरणे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची २६ तर अपंगाचा एक प्रकरण एका दिवसात निकाली काढले आहे. तथापि, काही मंजूर झालेली प्रकरणात तत्कालीन तहसिलदारांनी काढून ठेवल्या आहेत. यामुळे दोन दोन वर्षाची श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे आजही निकालात काढण्यात आली नाहीत. तसेच ज्यांची प्रकरणे मंजूर झाली नाही. विविध कारणामुळे काही लाभार्थ्यांना लेखी कळविण्यात न आल्याने आजही बरेच निराधार अर्थसहाय्यापासून वंचित आहेत. (तालुका प्रतिनिधी)