गडकरी यांना रेलयात्री सेवा समितीचे निवेदन
By Admin | Updated: October 6, 2015 00:46 IST2015-10-06T00:46:41+5:302015-10-06T00:46:41+5:30
भंडारा रोड शटल ट्रेन सुरु करावी, भंडारा रोड स्टेशनवर जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत...

गडकरी यांना रेलयात्री सेवा समितीचे निवेदन
भंडारा : भंडारा रोड शटल ट्रेन सुरु करावी, भंडारा रोड स्टेशनवर जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत व इतर मागण्यांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी रेलयात्री समितीचे पदाधिकारी रमेश सुपारे, वरियलदास खानवानी, सुरेश फुलसुंगे, ललीतकुमार बाच्छील यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आॅक्टोबर महिन्यात नागपूर येथे माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री, खासदारांची समिती व रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांची रेल्वेच्या संदर्भात बैठक होऊ घातली आहे.
त्या दृष्टीने जिल्ह्यातील खासदार प्रफुल पटेल नाना पटोले, ना.नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे भंडारा येथील शटल ट्रेनचा पाठपुरावा करावा व अन्य मागण्यांवर चर्चा करावी, अशी मागणी रेलयात्री सेवा समितीने केली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर २५ जलदगती गाड्यांचे थांबे नाहीत.
भंडारा रोड रेल्वे स्टेशन बोर्डाच्या समय सारणीत नाही. भंडारा रोड रेल्वे स्थानकाचा समावेश आदर्श रेल्वे स्थानकाच्या यादीत नाही. स्टेशनवर अनेक सोयींचा अभाव असल्याने प्रवाशात असंतोष आहे. या निवेदनातून संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)