रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक भरतात कुलरमध्ये पाणी

By Admin | Updated: May 30, 2014 23:28 IST2014-05-30T23:28:41+5:302014-05-30T23:28:41+5:30

तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लाखनी शहरात ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या लालफितशाही धोरणामुळे प्रलंबित आहे. जुन्या ग्रामीण रुग्णालयाची

The relative of the patients in the hospital fills the water with the cooler | रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक भरतात कुलरमध्ये पाणी

रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक भरतात कुलरमध्ये पाणी

लाखनी : तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लाखनी शहरात ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या लालफितशाही धोरणामुळे प्रलंबित आहे. जुन्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत पुर्णपणे जीर्ण झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने जुलै २0१३ मध्ये इमारतीमध्ये रुग्णालयाचे काम सुरू केले.
३0 ऑगस्ट २0१३ मध्ये भारतीय जनता युवा मोच्र्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन आमदार नाना पटोले यांच्या समक्ष तत्कालीन तहसीलदार डी.ए. सपाटे यांनी प्रशानाच्या वतीने गेल्या तीन महिन्यात इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. मात्र दिलेल्या कालावधीपासून ६ महिन्याच्या काळ उलटला तरी अजुनपर्यंत लोकार्पणाच्या मुहूर्त निघाला नाही.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक कुलरमध्ये पाणी भरत असताना दिसून आले. सध्या सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढत आहे.
उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सीअसवर पोहचला आहे. त्यातल्या त्यात रुग्णालयाच्या विहीरीवर असलेली मोटारपंच नादुरूस्त असल्यामुळे १६ मे ला सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत नवीन पंप लावण्यात आले.
मात्र कंत्राटदाराने पाईप लाईन फिटींग वारंवार सांगूनसुद्धा पूर्ण करून घेत नसल्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या बालकांना उन्हाचे चटके सहन होत नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक कुलरमध्ये पाणी भरतात. पिण्याच्या टाकीवरचा पाणी आणावे लागते तर जलप्राधिकारण कार्यालयातून कुलरमध्ये पाणी पुरवठा केला जातो. मात्र त्याची धार कमी असल्यामुळे एकेका कुलर भरायला बराच वेळ लागतो.
याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.  (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: The relative of the patients in the hospital fills the water with the cooler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.