ब्रिटिशकालीन तीन रेल्वे स्थानकांचे पुनरूज्जीवन
By Admin | Updated: January 28, 2016 00:31 IST2016-01-28T00:31:33+5:302016-01-28T00:31:33+5:30
‘साहेबांचा पोरगा मोठा अकली बीन बैलाने गाडी कशी ठकली’ अशी जुनी म्हण होती, तुमसर रोड - तिरोडी दरम्यान ब्रिटीशांनी प्रवाशी रेल्वे गाडी सुरु केली होती.

ब्रिटिशकालीन तीन रेल्वे स्थानकांचे पुनरूज्जीवन
जंगल सफारीचा मिळतो आनंद : गोबरवाही, डोंगरी व तिरोडी रेल्वे स्थानकांचा समावेश
मोहन भोयर तुमसर
‘साहेबांचा पोरगा मोठा अकली बीन बैलाने गाडी कशी ठकली’ अशी जुनी म्हण होती, तुमसर रोड - तिरोडी दरम्यान ब्रिटीशांनी प्रवाशी रेल्वे गाडी सुरु केली होती. सध्या या रेल्वेस्थानांची स्थिती दयनीय झाली होती. ब्रिटिशांचा वारसा पुढे चालू ठेवण्याकरिता गोबरवाही, डोंगरी व तिरोडी रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. सुमारे १० कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली.
तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान सुमारे ४५ कि.मी. पर्यंत ब्रिटिशांनी रेल्वे ट्रक घालता होता. या रेल्वे मार्गावर जगप्रसिद्ध तीन मॅग्नीज खाणी आहेत. तिरोडीनंतर कटंगीपर्यंत रेल्वे ट्रॅक नाही. कटंगी ते बालाघाट व जबलपूर पर्यंत रेल्वे ट्रॅक आहे. केवळ ८ कि.मी. चा ट्रक अजूनपर्यंत तयार करण्यात आला नाही. हा ट्रॅक तयार झाला तर सरळ उत्तर भारतात जाण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.
गोबरवाही, डोंगरी बु. व तिरोडी येथे मोठी रेल्वे स्थानके असून त्यांची स्थिती दयनीय झाली होती. या रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. येथे नवीन आधुनिक रेल्वे स्थानक तयार करण्याला सुरुवात झाली आहे. सुमारे १० कोटींचा निधी त्याकरिता मंजूर करण्यात आला आहे.
दिवसातून चारदा प्रवासी रेल्वेगाड्या या मार्गावरून धावतात. सकाळी तिरोडी ते इतवारी (नागपूर) व सायंकाळी इतवारी ते तिरोडी अशी सरळ गाडी या मार्गावर धावते. या मार्गावरील लहान लहान रेल्वे स्थानकाचीही दुरुस्ती करण्याची गरज आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा रेल्वे मार्ग जात असल्याने प्रवाशांना जंगलाची भ्रमंती करण्याचा अनुभव येथे येतो.