शेतीला हवा नियमित वीजपुरवठा
By Admin | Updated: August 14, 2015 00:04 IST2015-08-14T00:04:36+5:302015-08-14T00:04:36+5:30
खरीपाचं हंगाम सुरू झाला की, अघोषित भारनियमन सुरू होत असते. सद्या पाऊस दगा देत आहे.

शेतीला हवा नियमित वीजपुरवठा
मोहाडी : खरीपाचं हंगाम सुरू झाला की, अघोषित भारनियमन सुरू होत असते. सद्या पाऊस दगा देत आहे. धानाची रोवणी खोळंबली आहे. सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांना शेतकऱ्यांची धान रोवणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता प्रश्न आहे विज जाण्याचा. विज कधी जाईल याचे वेळापत्रक नाही. दिवसातून दहा वेळा विजेचा लपंडाव सुरू राहत असल्याने रोवणीसाठी सिंचन कसा करावा हा प्रश्न उभा राहतो. विद्युत विभागाने पावसाळ्यात शेतकऱ्यांचीच जास्त जिरवायची ठरवलं आहे. ज्या खरीप हंगामात नियमित थ्री फेज वीज हवी तेव्हाच वीज दगा देण्याचा प्रकार दरवर्षीचाच आहे. वरचाही कोपतो अन् वीजही शेतकऱ्यांवर मेहरबान होत नाही. एका पावसामुळे, एका पाण्यामुळे, वीज नसल्याने खरीप पिकांना कुठेना कुठे दगा बसतो. ही बाब नित्याची झाली आहे. शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. कधी पेटून उठणारा शेतकरी राज्यकर्त्यांच्या बनेल ते करा या पायी खचून गेला आहे. खरीप पिकांच नुकसान दरवर्षीच होत असतो. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण, त्यातला प्रमुख कारण विजेचा साथ शेतकऱ्यांच्या साथीला नसतो. विज राहत नाही म्हणून शेतकरी कर्जात राहून डिझेल एजंसीच्या सहायाने आपल्या धान पिकांना वाचविण्याची जीवघेणी कसरत करतो. धानपिक आले तरी उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नाही. ही समस्या मुळ आहे. उन्हाळी धान लावणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा तिच आहे. उन्हाळी भातपिक काढण्यासाठी विजेचा त्रास सहन करीत कसातरी घरी धान येते. मात्र आधारभूत केंद्रात पाठविलेला धान खरेदी होत नाही. डोंगरगाव आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांचे उन्हाळी धान काही खरेदी केले नाही. दीड महिन्यापासून धान पाण्यात भीजत आहेत. टोकन दिले गेले पण धान खरेदी नाही ही व्यथा शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांनी निर्माण केली आहे.
विजेचे वाढलेले दर अन् शेतकऱ्यांच्या शेती उत्पादन करण्यासाठी न मिळणारी सवलत हे दु:ख शेतकरी पचवित आहेत. उन्हाळ्यातही उन्हाळी पिक घेवू देत नाही अन् पावसाळ्यातही साथ न देणारी विज समस्या शेतकऱ्यांच्या अंगभर झाली आहे. त्यामुळे कर्जात मरणारा शेतकरी अतिशय व्यथीत आहे. हरदोली / झं. येथील शेतकऱ्यांने कर्जापायी विहरीत उडी घेवून दोन दिवसापुर्वी आत्महत्या केली. कर्जाची रेघ शेतकऱ्यांच्या कपाळावरून मिटत नाही तरी शासन शेतकऱ्यांसाठी योग्य ते करीत नाहीच ही भावना तयार झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप पिक घेण्यासाठी सिंचन व्हावे यासाठी विजेची सवलत मिळावी किंबहूना शेतकऱ्यांना मोफत विज दिली जावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)