नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट देणार प्रमाणित रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:42 IST2018-01-24T00:42:31+5:302018-01-24T00:42:51+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व मेडीकल कॉन्सीलला नोंदणीकृत असलेले डॉक्टरच (पॅथॉलॉजीस्ट) लेबॉरेटरी रिपोर्ट प्रमाणित करू शकतात.

नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट देणार प्रमाणित रिपोर्ट
आॅनलाईन लोकमत
भंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व मेडीकल कॉन्सीलला नोंदणीकृत असलेले डॉक्टरच (पॅथॉलॉजीस्ट) लेबॉरेटरी रिपोर्ट प्रमाणित करू शकतात. या आशयाची अंमलबजावणी करावी या आशयाचे निवेदन जिल्ह्यातील प्रॅक्टीसिंग, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ पॅथॉलॉजीस्ट अँड मायक्रोबॉयलॉजीस्ट या असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
यात जिल्हाधिकारी ही जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व लेबॉरेटरीचे सर्व्हेक्षण करून माहिती संकलीत करावी, स्वतंत्र व हॉस्पीटलमधील रिपोर्ट प्रमाणित करणाºया व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी व महाराष्ट्र मेडीकल कॉन्सील मान्यताप्राप्त पॅथॉलॉजीस्ट लेबॉरेटरी रिपोर्ट प्रमाणित करीत नसलेल्या पॅथॉलॉजी बंद करून महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम अंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. निवेदन देताना डॉ.पूनमचंद बावनकर, डॉ.विक्रम पटेल, डॉ.अजय लांजेवार, डॉ.अनुराधा चौधरी, डॉ.अर्पणा जक्कल, डॉ.राहुल वंजारी, डॉ.शुभांगी सतदेवे, डॉ.हितेंद्र खांडेकर, डॉ.क्रिष्णा मेश्राम, डॉ.सुनिल चकोले आदी उपस्थित होते.