शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जाणार पडद्याआड ! जलकुंभावर जल जीवन मिशनचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:26 IST

केला फक्त तगरंगोटीवर खर्च : २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : नागरिकांना जलशुद्धीकरण आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा बपेरा गावाचे हद्दीत तयार करण्यात आली. योजनेची जलवाहिनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात देण्यात आली. या योजनेचे अभिनव जलकुंभ निर्माण करण्यात आली. गुंडभर पाणी योजनेने नागरिकांना दिले नसताना योजनाच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेच्या जलकुंभावर जल जीवन मिशनने ताबा घेतला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पडद्याआड गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. 

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सुकळी नकुल प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. योजनेला जागा मिळाली नसल्याने बपेरा गावाचे हद्दीत ही योजना साकारण्यात आली आहे. योजनेला जलशुद्धीकरण केंद्र असल्याने जिल्हा परिषद क्षेत्रातील देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा, देवसर्रा, बिनाखी, गोंडीटोला, ब्राह्मणटोला, महालगाव, वारपीडकेपार, सोंड्या, गावात जलवाहिनी घालण्यात आली.

या योजनेचे गावात अभिनव जलकुंभ तयार करण्यात आले. जलवाहिनी आणि जलकुंभ बांधकामावर कोट्यवधी खर्च करण्यात आले. बावनथडी नदीवर पंपगृह देण्यात आले. योजनेपासून गावांचे आंतर १२ किमी अंतरावर असल्याने विलंब पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा गावकऱ्यांना होती. परंतु झाले उलटेच कोट्यवधी खर्चुनही योजनेचे पाणी गावात पोहचले नाही. 

पुन्हा गावकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना गावात मंजूर करण्यात आली. परंतु या योजनेने नागरिकांचा विश्वास संपादन केला. नसल्याने सर्वेक्षण करताना गावात विरोध होऊ लागला आहे. गावातील नळ योजनाच बरी, असे ठणकावून सांगितले आहे. परिसरात बहुतांश गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून एक थेंब पाणी नागरिकांचे दारात पोहचले नाही. जल जीवन मिशन हर घर नल योजनेच्या प्रस्तावित कामाची विभागीय चौकशी करण्याची ओरड सुरू झाली आहे.

२ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.बिनाखी गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ तयार करण्यात आलेला आहे. या जलकुंभात ग्रामीण नळ योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली आहे. जलकुंभाच्या दुरुस्तीवर २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे फलकात नमूद करण्यात आले आहे.

तरीही गावकरी तहानलेलेच !नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशन हर घर नल योजना अशा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. परंतु योजना नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करू शकल्या नाहीत, विशेषतः जल जीवन मिशन हर घर नल योजना वादग्रस्त ठरली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater shortageपाणीकपात