निवेदन देऊनही आरोग्य सभापती अनभिज्ञ
By Admin | Updated: April 28, 2016 00:26 IST2016-04-28T00:26:52+5:302016-04-28T00:26:52+5:30
बालकांसाठी असलेल्या लसविषयी दुर्लक्षासह पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग ....

निवेदन देऊनही आरोग्य सभापती अनभिज्ञ
प्रकरण बयाण गोपनियता भंगचे: सखोल चौकशी करण्याची गरज
भंडारा: बालकांसाठी असलेल्या लसविषयी दुर्लक्षासह पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग विषयाचे निवेदन जिल्हा आरोग्य सभापती यांना देण्यात आले. मात्र याविषयी ते अनभिज्ञ असल्याचे सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पहेला येथील आरोग्य केंद्रातील १४ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन १८ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या प्रतिलीपी जिल्हा परिषद अध्यक्षा, आरोग्य सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांना देण्यात आले. निवेदनासह जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीची प्रत व २३ फेब्रुवारी २०१६ ला झालेल्या चौकशी अहवालाच्या बयान प्रती सहपत्र म्हणून जोडलेल्या होत्या. पहेला येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे बयान गोपनीय झाल्यासंबधीचे वृत्त 'लोकमत'मध्ये सातत्याने प्रकाशित होत आहे. या प्रकरणात आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. या प्रकरणाविषयी आज, सदर प्रतिनिधीने जिल्हा आरोग्य सभापती विनायक बुरडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेत त्यांनी याविषयी अनभिज्ञ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या स्विय सहायकांशी चर्चा केली असता त्यांनी निवेदन प्राप्त झाले असल्याचे स्पष्ट केले. गोपनीय बयान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी चौकशी अधिकाऱ्यांची आहे. बयान सार्वजनिक करणे चुकीचे आहे, असे खुद्द आरोग्यमंत्री व वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. (नगर प्रतिनिधी)