एस.टी.चे दर कमी करा
By Admin | Updated: November 6, 2014 22:50 IST2014-11-06T22:50:53+5:302014-11-06T22:50:53+5:30
एस.टी.चे तिकीट दर त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

एस.टी.चे दर कमी करा
मनसेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : एस.टी.चे तिकीट दर त्वरित कमी करण्यात यावी, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
देशातील केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल नियंत्रणमुक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंती घसरल्यामुळे मागील पंधरा दिवसाच्या अंतरात ५.५० रूपये हून अधिकची घसरण डिझेलच्या दरात दोन टप्प्यामध्ये झालेली आहे. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या राज्य परिवहन महामंडळातर्फे सुरू असलेला एस.टी. विभाग डिझेलचे दर वाढले की लगेच एसटीचे तिकीट दरही वाढवायला विलंब लावत नाही. मात्र पंधरा दिवसांपासून देशभरात डिझेलचे दर कमी होवूनही राज्य परिवहन महामंडळ आता तिकीट दर कमी करण्याच्या ऐवजी मुंग गिळून बसलेले आहे. रापमंने वाढविलेले तिकीटांचे दर त्वरित कमी करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करीत आहे.
एकीकडे रापम हे एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी हे स्वत:साठी ब्रीदवाक्य वापरते. प्रत्यक्षात मात्र स्वत:च्या चुकांमुळे, कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे तोट्यात आलेले महामंडळ अशाप्रकारे जनतेची लुट करून स्वत:चा तोटा भरून काढण्याच्या प्रकाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा तीव्र विरोध असून जोपर्यंत वाढलेले डिझेलचे भाव कमी झालेले नाहीत, तोपर्यंत रापमतर्फे तिकीटांचे दर हे कमीच ठेवून जनतेला दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे संजय रेहपाडे, भरत वंजारी, धनंजय धुळसे, विशाल लांजेवार, प्रमोद मेंढे, ग्यानी घाटोळे, नजीर बांते, गुरूदेव बावनकर, प्रमोद सार्वे, मयुर लांजेवार आदींनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)