सामाजिक वनीकरणाच्या कामात बोगस मजुरांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:04+5:30

गांधीटोला येथील बेरोजगार युवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून खऱ्या अर्थाने ज्या युवकांना कामाची गरज असते त्यांना दोन तीन आठवड्याचे काम देवून बंद करण्यात आले. इतर काही लोकांना सतत वर्षभर कामावर ठेवण्यात आले. तसेच हजेरी रजिस्टरवर काही अशा लोकांची नावे चढविण्यात आली की जे दुसऱ्या ठिकाणी काम करुन किंवा नोकरी करुन अर्थाजन करीत आहेत.

Recruitment of bogus laborers in social forestry work | सामाजिक वनीकरणाच्या कामात बोगस मजुरांची भरती

सामाजिक वनीकरणाच्या कामात बोगस मजुरांची भरती

Next
ठळक मुद्देशासनाला आर्थिक भुर्दंड : बेरोजगार युवकांना काम नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील गांधीटोला परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि वृक्षांची देखभाल करण्याचे काम मागील दीड वर्षापासून सुरु आहे. येथील कामात मोठ्या प्रमाणावर बोगस मजूर भरती करुन त्यांच्या नावाची मजुरीची रक्कम हडपली जात असल्याचा आरोप काम करणारे कर्मचारी आणि कामाची पाहणी करणारे लोक करीत आहे. त्यामुळे गांधीटोला येथील बेरोजगार युवकांमध्ये रोष व्याप्त आहे.
गांधीटोला येथील बेरोजगार युवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून खऱ्या अर्थाने ज्या युवकांना कामाची गरज असते त्यांना दोन तीन आठवड्याचे काम देवून बंद करण्यात आले. इतर काही लोकांना सतत वर्षभर कामावर ठेवण्यात आले. तसेच हजेरी रजिस्टरवर काही अशा लोकांची नावे चढविण्यात आली की जे दुसऱ्या ठिकाणी काम करुन किंवा नोकरी करुन अर्थाजन करीत आहेत. त्यांच्या नावाने खात्यात आपोआप मजुरीची रक्कम जमा होते.यापैकी एका बोगस मजुराने कबूल सुद्धा केले. मी वनीकरणाच्या कामावर जात नाही तरी खात्यावर मजुरीची रक्कम जमा केली. रक्कम जमा झाल्यावर कामाची देखरेख करणाºया कर्मचाºयाने रक्कम काढून मागीतली अशा प्रकारे अनेक लोक बोगस मजूर म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गरजू बेरोजगार लोकांना कामापासून वंचित राहावे लागते.
बोगस मजुरांची भरती करुन लाखोचा भुर्दंड शासनाला बसत आहे.तर बेरोजगार युवकांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे, भुमेश्वर मेंढे, रेखा फुंडे यांनी केली आहे. नियमित कामाची मागणी करणाऱ्या युवकांमध्ये खेमेंद्र कोरे, रामदास कोरे, धमेंद्र गाते, विक्की चर्जे, रोहीत कोरे, निलेश राऊत, नितेश कोरे, महेश कठाणे, रामदास कोरे, संदीप भांडारकर, राहुल कोरे, रितेश गजबे, शुभम वाढई, निखिल शेंडे, रामकृष्ण भाजीपाले, आकाश कोरे, सुशील मेंढे, स्वयंम चुटे, विनीत मेंढे, दीक्षीत कोरे, हाबुराव कोरे या युवकांचा समावेश आहे.

Web Title: Recruitment of bogus laborers in social forestry work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.