१२ वर्षांत ९.९९ कोटींचा करमणूक कर
By Admin | Updated: February 26, 2016 00:41 IST2016-02-26T00:41:36+5:302016-02-26T00:41:36+5:30
राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी गत तपभरात दिलेल्या करमणूक कर शुल्क वसूलीच्या उद्दीष्टानुसार ९ कोटी ९९ लाख ७७ हजार रूपयांची वसूली केली आहे.

१२ वर्षांत ९.९९ कोटींचा करमणूक कर
देवानंद नंदेश्वर भंडारा
राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी गत तपभरात दिलेल्या करमणूक कर शुल्क वसूलीच्या उद्दीष्टानुसार ९ कोटी ९९ लाख ७७ हजार रूपयांची वसूली केली आहे. जिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने महसूल गोळा केला आहे.
केबलच्या तुलनेत डीटीएच लावल्याने टीव्ही चांगली दिसते. त्याचबरोबर संपूर्ण चॅनेल डीटीएचवर बघायला मिळतात. त्याचबरोबर केबल तुटल्याचीही तक्रार राहत नाही. त्यामुळे ग्राहक डीटीएचकडे वळला आहे. भंडारा जिल्ह्यात डीटीएच ग्राहकांची संख्या जवळपास २० हजारांच्या घरात आहे. डीटीएच रिचार्ज मोबाईलच्या माध्यमातून मारले जातात. त्यामुळे याबाबतची नोंद मुंबई येथील कार्यालयात होते. त्याची एक प्रत जिल्हा कार्यालयाला पाठविले जाते. जिल्ह्यात व्हिडीयो केंद्र नाही.
भंडारा जिल्ह्यात तीन चित्रपटगृह आहेत. यात भंडारा येथे १, पवनीत २ तर साकोलीत एक फिरते चित्रपटगृह आहे. जिल्ह्यात नऊ व्हिडीयो गेम पार्लर आहेत. यात भंडारा येथे २, मोहाडी येथे २, तर तुमसर येथे ५ व्हिडीयो गेम पार्लरचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात करमणुकीच्या विविध माध्यमातून सन २००४-०५ ते सन २०१५-१६ (फेब्रुवारीपर्यंत) ९ कोटी ९९ लाख ७७ हजार रूपयांचा महसूल करमणूक विभागाने गोळा केला आहे.
मागील १२ वर्षात करमणूक कर वसूली लक्षात घेतली तर सन २००९-१० मध्ये सर्वाधिक १२५ टक्के, तर सन २००४-०५ आणि सन २००५- ०६ मध्ये सर्वात कमी २८ टक्के वसूली करण्यात आली आहे.