१२ दिवसात ८० हजारांचा दंड वसूल
By Admin | Updated: June 14, 2014 23:24 IST2014-06-14T23:24:22+5:302014-06-14T23:24:22+5:30
विविध प्रकारच्या गौण खनिजांची चोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. १२ दिवसात ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

१२ दिवसात ८० हजारांचा दंड वसूल
तस्करांचे नेटवर्क मजबूत : तहसीलदारांच्या पथकाची कारवाई
तुमसर : विविध प्रकारच्या गौण खनिजांची चोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. १२ दिवसात ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा साठा आहे. रेती, मुुरुम, गिट्टी, मॅग्नीज, डोलामाईट व अन्य सध्या शासनाकडून या गौण खनिजाच्या उत्खननाला शासनाकडून परवानगी देण्यात आली नसली तरी मोठ्या प्रमाणात या गौण खनिजांची चोरी होत आहे. याची माहिती तहसीलदार यादव यांना मिळाली. या प्रकरणाला गंभीर समजून यादव यांनी कारवाई करण्याचा धाडस कोणत्याही राजकीय दबावाला न मानता केला. याचा लाभ शासनाला झाला.
दि. १ जून २०१४ पासून या कारवाईला सुरुवात झाली. नायब तहसीलदार अरविंद हिंगे व सूर्यवंशी यांच्या सहकार्याने उपविभागीय अधिकारी लटारे यांच्या मार्गदर्शनात कारवाई झाली. सकाळी तीन वाजेपासून यांनी मांडवी, माडगी, बाम्हणी, ढोरवाडा, तामसवाडी, पांजरा, आष्टी व इतर ठिकाणी धाडी घातल्या. मोठ्या प्रमाणात चोरी करणारे ट्रक पकडले तर १२ जून २०१४ पर्यंत २१ ट्रकवर कारवाई केली. यात ८० प्रत्येकी ३२०० याप्रमाणे ३० हजाराचा दंड वसुल करून महसूल खात्यात जमा केला. यात दोन ट्रॅक्टर मालकावर चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. हे ट्रॅक्टर तिरोडा तालुक्यातील असून एका प्रकरणी राजकीय व्यक्तीचे आहे. तरीही अधिकाऱ्यांनी यांना न जुमानता गुन्हा दाखल केला.
ही कारवाई अधिकारी जीव मुठीत घेऊन करत असल्याचे समजते. कारण हे चोरी करणारे मुजोर झाले असून हे कुणालाही घाबरत नाही. यांना नेटवर्क एवढा आहे की अधिकारी कारवाई करण्यास निघाले असता यांना माहिती मिळते. हेच नाही हे आपले माणसे लावून ठेवतात. जिथे जिथेअधिकारी जातात त्यांच्या मागे माणूस असतो. अनेकदा अधिकारी सिनेस्टाईलने तोंडाला बांधून पहाटे निघतात तरी हे चोरटे वाचतात.(तालुका प्रतिनिधी)