रेकॉर्ड ब्रेक : भंडारा ४७

By Admin | Updated: June 7, 2014 01:22 IST2014-06-07T01:22:40+5:302014-06-07T01:22:40+5:30

सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपा समाप्तीनंतर तापमानात

Record Break: Bhandara 47 | रेकॉर्ड ब्रेक : भंडारा ४७

रेकॉर्ड ब्रेक : भंडारा ४७

अघोषित संचारबंदी : मागील १२ वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद
देवानंद नंदेश्‍वर भंडारा

सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपा समाप्तीनंतर तापमानात थोडीफार घट होईल, अशी अपेक्षा असताना आज, शुक्रवार रोजी पारा ४७ अंशावर  धडकला. मागील १२ वर्षाची रेकार्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाची सर्वाधिक झळ  आज जाणवली. जिल्ह्यात दिवसभर अघोषित  संचारबंदीचे रुप पहावयास मिळाले.
उष्णतेत कमालिने वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.  शहरातील वर्दळ सायंकाळपर्यंत मंदावली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.
मागील १२ वर्षांमध्ये सर्वाधिक तापमान सन २00२ मध्ये ४३ अंश, २00३ मध्ये ४२ अंश, २00४ मध्ये ४२ अंश, २00५ मध्ये ४६ अंश,  २00६  मध्ये ४२ अंश, २00७ मध्ये ४४.५ अंश, २00८ मध्ये ४२.५ अंश, २00९ मध्ये ४४.५, सन २0१0 मध्ये ४६ अंश,  २0११ मध्ये ४६.५ अंश, सन  २0१२ मध्ये ४६.५ अंश, सन २0१३ मध्ये ४६ अंश तर यावर्षी दि.६  जून रोजी ४७ अंश तापमान नोंदविण्यात आले. मागील १२ वर्षांमध्ये सर्वाधिक  तापमानाची नोंद आज करण्यात आली.
उष्णतेच्या बचावासाठी शहरात ठिकठिकाणी रसवंती, शितपेयांची दुकाने थाटलेली आहेत. टरबूज, खरबूज, डांगर, अननस आदींची विक्री वाढली  आहे. आज कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पार्‍यात अधीक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे  घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे.
किमान नोंदीच्या यंत्रात बिघाड
उन्हाळ्यात उष्णतेचे तापमान मोजण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचे कार्यालय आहे. परंतु भंडारानजीकच्या कारधा येथे असलेल्या  कार्यालयात गत तीन महिन्यांपासून किमान नोंदणीच्या यंत्रात बिघाड झाल्याने त्याची नोंद केली जात नाही. परिणामी कमाल तापमानाची नोंदीची  माहिती मिळत असली तरी किमान तापमानाची नोंद मिळत नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांना यंत्र दुरूस्तीविषयी कळविण्यात आले. मात्र अद्यापही  किमान नोंदीचे यंत्र हवामान कार्यालयात लावण्यात आले नाही. येथील कार्यालय अधिकार्‍यां विना कर्मचार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे.
 

Web Title: Record Break: Bhandara 47

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.