नवचैतन्य विद्यालयात सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:27+5:302021-07-02T04:24:27+5:30

भंडारा : शिवनी येथील नवचैतन्य विद्यालयात सहायक शिक्षक नेमीचंद नागोराव बागडे हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम आयोजित ...

Reception ceremony at Navchaitanya Vidyalaya | नवचैतन्य विद्यालयात सत्कार समारंभ

नवचैतन्य विद्यालयात सत्कार समारंभ

भंडारा : शिवनी येथील नवचैतन्य विद्यालयात सहायक शिक्षक नेमीचंद नागोराव बागडे हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तू. अ. वनवे, संस्था सचिव उ.का. आठोडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. राऊत, शिक्षकवृंद आणि पाहुणे मंडळी उपस्थित होती. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक शेंडे यांनी प्रास्ताविक तर संचालन बान्ते यांनी केले. आभार प्रदर्शन एम. ए. किरणापुरे यांनी केले. कार्यक्रमाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा संघटक राजेश राऊत व सामाजिक कार्यकर्त्या स्वाती राऊत उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात वनवे यांनी बागडे यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्था सचिव आठोडे यांनी बागडे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. उपरोक्त कार्यक्रमाला शाळेतील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कोविड १९ च्या नियमांचे पालन करून थोडक्यात साजरा करण्यात आला.

Web Title: Reception ceremony at Navchaitanya Vidyalaya