प्रधानमंत्र्यांच्या छायाचित्राची विटंबना
By Admin | Updated: June 25, 2017 00:21 IST2017-06-25T00:21:07+5:302017-06-25T00:21:07+5:30
फेसबुकच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राची विटंबना करून वाद निर्माण करून भावना दुखावल्या आहेत.

प्रधानमंत्र्यांच्या छायाचित्राची विटंबना
भोंडेकरांनी केली पोलिसांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : फेसबुकच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राची विटंबना करून वाद निर्माण करून भावना दुखावल्या आहेत. असा प्रकार करणाऱ्या इसमांविरूद्ध गुन्हे नोंद करून अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा पोलीसात दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
शनिवारला भोंडेकर यांच्या फेसबुक आयडीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राची छेडछाड करून आपत्तीजनक पोस्ट अपलोड करण्यात आली. यामुळे वाद निर्माण करण्याचा कट असल्याचे दिसून येत असून अशांविरूद्ध गुन्हे नोंदवून अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी भोंडेकर यांच्यासह संजय रेहपाडे, सुर्यकांत ईलमे, सुरेश धुर्वे, अनिल गायधने, सतीश तुरकर, दिनेश गजबे शिवसैनिक उपस्थित होते.