ईव्हीएममधील हेराफेरी पराभवाला कारणीभूत
By Admin | Updated: December 22, 2016 00:49 IST2016-12-22T00:49:38+5:302016-12-22T00:49:38+5:30
नुकतीच भंडारा नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने वापरलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून ठेवल्याने माझा पराभव झाला.

ईव्हीएममधील हेराफेरी पराभवाला कारणीभूत
धनराज साठवणे यांचा आरोप : मशीनची तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी
भंडारा : नुकतीच भंडारा नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने वापरलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून ठेवल्याने माझा पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व ईव्हीएम मशीनची तज्ज्ञाकडून तपासणी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार धनराज साठवणे यांनी केली आहे.
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ईव्हीएम व्होटींग मशीनची तपासणी मतदानापुर्वी उमेदवारांना दाखविण्यात आलेली नाही. ईव्हीएम मशीनमध्ये पक्षाच्या दबावात येवून अधिकाऱ्यांनी गडबडी करून ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माझ्या मताच्या बेरजेच मोठी तफावत आली असून या सर्व मशीनमुळेच माझा पराभव झाला, असा आरोप साठवणे यांनी लावला आहे.
शासन आदेशाची व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भंडारा शहरात अवहेलना झाली असून मतदानापुर्वी ईव्हीएम मशीनची टेस्टींग करण्यात आली नाही. मतदान मशीन ही बरोबर सुरू आहे. याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. भंडारा न.प. च्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या संपूर्ण प्रभागातील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे. त्यांचा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला आहे. मतदानात घोळ निमार्ण झाला असून या मशीनची तपासणी करावी.
माझ्या प्रभागात व लगतच्या प्रभागात मतदारांनी मला भरघोष मत दिले. ८० टक्के मतदान माझ्या बाजूने झाले असताना मला फार कमी मतदान झाले तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना जास्त मतदान मिळाले. ईव्हीएम मशीन उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदानापुर्वी तपासणी करून दाखविणे गरजेचे आहे. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाने याची अवहेलना केली.
तज्ज्ञांकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करून ती मशीन कोणत्या कंपनीची आहे, टेस्टींग रिपोर्ट तसेच आॅडिट रिपोर्ट देण्यात यावा या करीता लागणारा संपूर्ण खर्च मी करायला तयार असून माझ्यावर झालेला अन्याय यासाठी मला न्याय मिळावा या दृष्टीने प्रशासनाने व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. (शहर प्रतिनिधी)