शाळा, कार्यालयात सामूहिक संविधान वाचन
By Admin | Updated: November 26, 2015 00:40 IST2015-11-26T00:40:39+5:302015-11-26T00:40:39+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जाणार आहे.

शाळा, कार्यालयात सामूहिक संविधान वाचन
भंडारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील शाळा, कार्यालयात संविधान प्रास्ताविक वाचन करणार आहेत.
संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणार आहेत. हीच तत्त्वे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक नागरीक बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानातील तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरूवातीपासून संविधानाची पुरेशी ओळख व त्यातील तत्त्वांविषयी जागृती करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साजरा करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.
संविधानाची ओळख आवश्यक
२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान अंगिकृत व अधिनियमित होऊन स्वत: प्रत अर्पित झाले, २६ नोव्हेंबंर १९५० ला देश प्रजासत्ताक झाला. संविधानाचा खऱ्या अर्थी अंमल सुरू झाला. राष्ट्राची एकात्मता व बंधुता प्रवर्धित होण्यासाठी संविधनाबाबत माहिती असणे आवश्यक आहे. संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्ट्रग्रंथ आहे. हक्क व संरक्षणासोबतच नागरिकांचे कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यासाठी संविधानाची ओळख होणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)