शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:50 IST2019-01-19T21:49:42+5:302019-01-19T21:50:04+5:30
सर्वत्र शेतकरी व शेतमजुरांची अवस्था खुप बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधून यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष महले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : सर्वत्र शेतकरी व शेतमजुरांची अवस्था खुप बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधून यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष महले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनानेही धानाला २,५०० रुपये हमीभाव द्यावा अथवा ७५० रुपये बोनस जाहीर करावा. तसेच महाराष्ट्रातील पूर्व विदभार्तील सर्व नगरपंचायती मध्ये रोजगार हमीचे कामे सुरू करावे यासह अन्य मागण्या निवेदनातुन देण्यात आले.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या होत आहेत यासाठी जगाचा पोशिंदा जगवायचा असेल तर धानाला २५०० रुपये भाव मिळावा म्हणून शासनाने प्रयत्न करावे. ज्या शेतकºयांनी धान विकले आहे. मात्र अजूनही शासनाने बोनस जाहीर केला नसून शासनाने तात्काळ ७५० रुपये बोनस जाहीर करावा. या सर्व मागण्यावर येत्या सात दिवसात तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने २८ जानेवारी रोजी आमरण उपोषण व बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर, अध्यक्ष संदीप नाकतोडे, सदस्य जितू सुखदेव, चंद्रशेखर खेडीकर, आकाश दखणे, पप्पू मातेरे, विश्वपाल हजारे, मंगेश राऊत, जितेंद्र ढोरे, श्रीकांत बोरकर, पवन समरत, स्वप्नील ठेंगरी, बाळू शिलार, आसाराम कोटरंगे, राकेश हत्तीमारे, मंगेश सुखदेवे, श्रीकांत बोरकर, लुनेश लांडगे, सचिन सांगोळे, श्रीहरी भेंडारकर, नितीन बुरडे, हिरालाल ठाकरे, पितांबर मेश्राम, प्रदीप भेंडारकर ,उमेश बगमारे यांच्या सह आदी उपस्थित होते.