लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील भाजयुमोच्या नेतृत्वात धान खरेदी संदर्भात पवनी -वडसा टी पॉईंटवर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आमदार डॉ. परीणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, ॲड. वसंत एंचीलवार, वामन बेदरे, गोपी भेंडारकर, नरेश खरकाटे, माजी सभापती नुतन कांबळे, माजी उपसभापती शिवाजी देशकर, तुळशिदास बुरडे, गिरीश भागडकर, भारती दिवठे, माधुरी हुकरे, हरगोविंद नखाते यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनी शासनाद्वारे गत एक वर्षात अवैधरित्या मंजूर करण्यात आलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रा अंतर्गत बारदान्याचा अपूरा पुरवठा, धान खरेदी केंद्रांवर प्रति क्विंटल ५ ते ८ किलो अधिकचे धान खरेदी, धान खरेदी दरम्यान शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आलेला गोदामाचे अवैध किराया, यासह अन्य अतिरिक्त अवैध वसुली यांसारखे विभिन्न आरोप लावून शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत भ्रष्टाचार होण्याचा आरोप केला. रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो विधानसभा प्रमुख प्रियंक बोरकर व भाजयुमो तालुकाध्यक्ष योगेंद्र ब्राम्हणकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारा करण्यात आले होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त- तालुका भाजयुमोद्वारे स्थानिक लाखांदूर येथील वडसा - पवनी टी पॉइंटवर आयोजीत रास्ता रोको आंदोलना दरम्यान ये - जा सह अन्य दुर्घटना थांबविण्यासाठी लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यादरम्यान लाखांदूर पोलीसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.