मराठी शाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी रस्सीखेच
By Admin | Updated: May 10, 2014 00:16 IST2014-05-10T00:16:36+5:302014-05-10T00:16:36+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावा गावात झाल्याने प्राथमिक शाळांमध्ये मराठी चौथा पास विद्यार्थी कमी झाले. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधासाठी गावोगाव फिरावे लागत आहे.

मराठी शाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी रस्सीखेच
कोंढा (कोसरा) : इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावा गावात झाल्याने प्राथमिक शाळांमध्ये मराठी चौथा पास विद्यार्थी कमी झाले. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधासाठी गावोगाव फिरावे लागत आहे.
शिक्षकी स्वयसाय प्राचीन काळात पवित्र समजले जात असे. शिष्य गुरूच्या शोधात जात होते. पण सध्या काळ बदललेला आहे. गुरू शिष्याच्या शोधासाठी भर उन्हाळ्यात गावा गावात फिरताना दिसतात. निवडणुकीत उमेदवार, कार्यकर्ते जसे मतदान मागण्यासाठी फिरत होते तसेच शिक्षक दारोदार फिरताना दिसत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. ज्या शाळांना दहावी, बारावी परीक्षेचे केंद्र तेथे विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याकडे कल दिसते.
तसेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना मोठे आर्थिक प्रलोभन दिले जात आहे. स्कुल ड्रेस, वह्यापुस्तके देऊ, छत्री, सायकल अशी प्रलोभन दिले जात आहे. परिसरात एका शाळेच्या शिक्षकांनी पालोरा चौ. लोन्हारा, सोनेगाव येथे बस पाठवू तसेच पालकांना मोठे आर्थिक प्रलोभन दिले जात आहे.
शिक्षण हक्क कायदा २00९ नुसार बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण झाले आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंत विद्यार्थ्यांना पास करावे लागते. गाव तिथे खाजगी शाळा शासनाने वाटल्याने ही परिस्थिती शिक्षकांवर आली आहे. ग्रामीण भागात जि.प. प्राथमिक शाळांची वर्गसंख्या वेगाने अतिशय कमी होत आहे तसेच गावा गावात इंग्रजी शाळा निघाल्या आहेत. मोठय़ा शहरातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा बसेस ग्रामीण भागात पाठवित असल्याने चौथा वर्ग पास विद्यार्थी संख्या अतिशय कमी झाली आहे. अशावेळी शासनाने चौथा वर्ग प्राथमिकला जोडण्याचा सुचना असल्याने खासगी शाळा अडचणीत आल्या आहेत. (वार्ताहर)