रानडुकराचा चिमूकलीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:49 IST2017-09-11T23:49:00+5:302017-09-11T23:49:13+5:30

शहरातील गांधी सागर परिसरात रानडुकराने तीन वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला केला. यात मूलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Randukar's Chimukuli attack | रानडुकराचा चिमूकलीवर हल्ला

रानडुकराचा चिमूकलीवर हल्ला

ठळक मुद्देपायाला गंभीर दुखापत : नागरिक धावून आल्याने बचावली

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरातील गांधी सागर परिसरात रानडुकराने तीन वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला केला. यात मूलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जवळील नागरिक धावून आल्याने ती थोडक्यात बचावली. गंभीर जखमी चिमुकलीचे नाव अर्नवी ढेंगे (३) आहे. ही घटना सोमवारी सकाळी ५.३० वाजता घडली.
अर्नवी ढेंगे हिचे घर गांधीसागर तलावाजवळ माकडे वॉर्डात आहे. सकाळी ती घराच्या अंगणात खेळत होती. तितक्यात रानडुकराची टोळी तिथून जात होती. एका रानडुकराने अर्नवीला उचलले. फरफटत नेताना ती मोठ्याने ओरडली. घराजवळील नागरिकांना अर्नवी दिसली. नागरिक तिच्या मदतीला धावून गेले. रानडुकराच्या तावडीतून अर्नवीची नागरिकांनी सुटका केली. अर्नवीच्या पायाला गंभीर जखम झाली. रुग्णालयात तिच्यावर पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गांधीसागर तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मोठे गवत उगवले आहे. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी माकडे नगरवासीयांनी केली आहे.

Web Title: Randukar's Chimukuli attack