रानडुकराने ठोकला घरात रात्रभर मुक्काम

By Admin | Updated: April 25, 2017 00:18 IST2017-04-25T00:18:15+5:302017-04-25T00:18:15+5:30

जंगलालगत गाव म्हटले की, हिंस्त्र श्वापद व मानवांचा संघर्ष नेहमीचा विषय आहे.

Randukar stuck in the house and stayed overnight | रानडुकराने ठोकला घरात रात्रभर मुक्काम

रानडुकराने ठोकला घरात रात्रभर मुक्काम

कोका येथील घटना : रात्री २.३० वाजता पळवून लावण्यात वनविभागाला आले यश, जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
भंडारा : जंगलालगत गाव म्हटले की, हिंस्त्र श्वापद व मानवांचा संघर्ष नेहमीचा विषय आहे. या श्वापदांच्या हल्ल्यात शेकडो ग्रामस्थ जखमी झाल्याची नोंद शासकीय दफतरी आहे. कोका येथे असाच प्रकार रविवारी रात्रीला घडला. जंगली डूकराने ग्रामस्थाला जखमी करुन एका घरामध्ये बसस्थान मांडले. हा थरारक प्रकार मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत चालला. या प्रकाराने वनकर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली.
मधुकर गोमा हातझाडे (६३) असे जखमीचे नाव आहे. कोका हे गाव जंगलाच्या सानिध्यात वसले आहे. या दरम्यान वाघ, बिबट यांच्यासह हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. अनेकदा हे प्राणी कोका गावात येतात. रविवारला दिवसभर शेतात राबल्यानंतर मधुकर हातझाडे हे सायंकाळी घरी आले. यानंतर ते घरातील अंगणात बसले असतांना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जंगलातून सुसाट वेगात आलेले एक डुक्कराने थेट मधुकर यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या डुकराच्या हल्ल्याने मधुकर हे भयभीत झाले व जिवाच्या आकांताने वाचविण्यासाठी किंकाळी फोडली. ग्रामस्थ त्याच्या मदतीला धावून येईपर्यंत मधुकर हे रक्तबंबाड झाले होते.
ग्रामस्थांच्या ओरडण्याने भांबावलेले डुक्कर लगतच्या सुधाकर हातझाडे यांच्या घरात शिरले. क्षणाचा विलंब न लावता. सुधाकर यांनी घराच्या दाराची कडी बाहेरुन लावली व डुकराला घरात कोंडले. दरम्यान कोका वन कार्यालयात उपस्थित क्षेत्र सहायक डब्ल्यू आर. खान, वनरक्षक विपीन डोंगरे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक गोबाडे यांनी जखमी मधुकर यांना वनविभागाच्या वाहनाने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
दरम्यान गावात रानडुकराने मधुकर हातझाडे यांना जखमी करुन सुधाकर हातझाडे यांच्या घरात शिरल्याची माहिती ऐव्हानात गावात पसरली. यामुळे ग्रामस्थांनी हातझाडे यांच्या घरासमोर एकच गर्दी झाली. सदर घटनेची माहिती क्षेत्र सहायक डब्ल्यू. आर. खान यांनी उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना दिली. त्यांच्या निर्देशानुसार सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनजीव विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी यांनी कोका गाठले. यानंतर सदर वन कर्मचाऱ्यांनी घरात कोंडलेल्या रानडुकराला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हा प्रकार मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत चालला. यानंतर ग्रामस्थांना शांत करुन एका बाजुला उभे राहण्याचे सांगुन मोठ्या शिताफीने घराचे दार उघडले. यानंतर डुकराने पळ काढला. तो जंगलात गेल्याने ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. (शहर प्रतिनिधी)

वन कर्मचाऱ्यांनी रात्र काढली जागून
कोका येथे घडलेल्या या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. जंगली डूक्कर जंगलात सुरक्षीत स्थळी गेला. मात्र, तो परत येवू नये याकरिता वनकर्मचाऱ्यांनी कोका येथे रात्र जागून काढली. सायंकाळी ७ वाजेपासून तर पहाटे ६ वाजेपर्यंत डूकराकरिता वन कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. सकाळी ६ नंतर सर्व वन कर्मचारी कर्तव्यावर घरी पोहचले. या छोट्याशा घटनेवरुन वन कर्मचाऱ्यांचे कर्तव्य लक्षात येते.

डूकराच्या हल्ल्यात जखमी झालेले मधुकर हातझाडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मदत करु.
डब्ल्यू. आर. खान
क्षेत्र सहायक, कोका

Web Title: Randukar stuck in the house and stayed overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.