रानडुकरांनी केला ऊस उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:37 IST2017-02-22T00:37:44+5:302017-02-22T00:37:44+5:30
चिखला येथील शेतश्विारात उभ्या ऊस पिकांची रानडुकरांनी प्रचंड नासाडी करून ऊस उध्वस्त केले.

रानडुकरांनी केला ऊस उद्ध्वस्त
चिखला येथील प्रकार : शेतकऱ्यांचा जीव धोक्यात
तुमसर : चिखला येथील शेतश्विारात उभ्या ऊस पिकांची रानडुकरांनी प्रचंड नासाडी करून ऊस उध्वस्त केले. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी यांच्याकडे नुकसान भरपाईकरिता संबंधित शेतकऱ्यांने निवेदन दिले आहे.
मोतीराम ग्यानीराम वाघमारे रा. चिखला यांची चिखला शिवारात शेतजमीन आहे. गट क्रमांक ५४, १.८० हेक्टर क्षेत्रात वाघमारे यांनी ऊस पिकाची लागवड केली. परंतु रानडुकरांनी वाघमारे यांच्या शेतातील ऊस उध्वस्त केल्याने पिकांची नासाडी झाली आहे. वाघमारे यांनी कर्ज घेऊन नगदी समजल्या जाणाऱ्या ऊस पिकाची लागवड केली होती.
चिखला गाव सातपुडा पर्वत रांगात आहे. चहुबाजूंनी जंगल आहे. रानडुकरांचे मोठे कळप शेतातील उभ्या पीकात शिरतात.
संपूर्ण पीक उध्वस्त केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या जीवालाही या वन्यप्राण्यांपासून मोठा धोका येथे आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायम बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाघमारे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या ऊसाची मौका चौकशी व पंचनामा करून नुकसान भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी मोतीराम वाघमारे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मागील अनेक महिन्यांपासून चिखला शिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस सुरु आहे. यात रानडुकरांचा समावेश आहे. पीक उध्वस्त केले जाते. शेतकऱ्यांवर येथे उपाशी मरणाची वेळ आली आहे. वनविभागाने येथे रानडुकरांचा बंदोबस्त करावा.
- दिलीप सोनवाने
सरपंच चिखला