रापमची ‘अपघातविरहित’ मोहीम

By Admin | Updated: January 13, 2015 22:54 IST2015-01-13T22:54:57+5:302015-01-13T22:54:57+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत सुरक्षितता महीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान विभागीय कार्यालयाने अपघात व सुरक्षितता

Rampamchis 'accidentless' campaign | रापमची ‘अपघातविरहित’ मोहीम

रापमची ‘अपघातविरहित’ मोहीम

भंडारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत सुरक्षितता महीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान विभागीय कार्यालयाने अपघात व सुरक्षितता उपाययोजनांची आवश्यकता या विषयावर भर दिला.
रापमच्या सर्व विभागीय कार्यालयांतर्गत आगारात १ ते १० जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहिम राबविण्यात आले. यादरम्यान आगार प्रमुखांच्या संपर्कात राहून चालक-वाहकांसोबत बैठकीवर भर देण्यात आला. मोहिमेदरम्यान व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्रानुसार, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजस्थानच्या वतीने 'रस्ते मोटर वाहन अपघात व सुरक्षितता' या विषयावर सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.
भंडारा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा व पवनी आगारात सुरक्षितता मोहिम राबविण्यात आली. दहा दिवस राबविलेल्या मोहिमेदरम्यान आगाराचे पालक अधिकारी विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व यंत्र अभियंता (चालान) यांच्या संयुक्तविद्यमाने आगारांना भेटी देऊन अपघात सुरक्षेबाबत चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. 'अपघात व सुरक्षितता उपाययोजनांची आवश्यकता' यावर मार्गदर्शन करण्यात आले. बिना अपघात मोहिम कालावधीत कर्मचारी व वाहक-चालकांची आरोग्य तथा नेत्र तपासणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rampamchis 'accidentless' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.