रामजी की निकली सवारी
By Admin | Updated: April 17, 2016 00:25 IST2016-04-17T00:25:09+5:302016-04-17T00:25:09+5:30
प्रभु श्रीरामचंद्र यांच्या पावन जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रामजी की निकली सवारी
भंडारा : प्रभु श्रीरामचंद्र यांच्या पावन जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातील बहिरंगेश्वर देवस्थान परिसरातील श्रीराम मंदिरातून श्रीराम रथ यात्रा व आकर्षक देखाव्यांची शोभायात्रा काढण्यात आली. ‘श्रीराम जय राम जय जय राम ’ च्या जयघोषात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या शोभायात्रेत श्रीराम, सीतामाता, राम-हनुमान, श्रीराम चरित्र यावर देखावे सादर करण्यात आले. दिघोरी (मोठी) येथे रथयात्रा लाकडी चाकांच्या रथावर शोभायात्र काढण्यात आली. हा रथ भाविक ओढून नेत असतात. या रथयात्रेत गावातील सर्वच भजनी मंडळ सहभागी होत असून रामनामाचा जयघोष व हरिनामाच्या गजराने वातावरण भक्तीमय झाले. तुमसर, साकोली आणि पवनी शहरातही रामनामाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.