नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:21+5:302021-05-11T04:37:21+5:30
पवनी : नगर परिषद पवनीचे मुख्याधिकारी रवींद्र ढाके नियत वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी ...

नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’
पवनी : नगर परिषद पवनीचे मुख्याधिकारी रवींद्र ढाके नियत वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी ते कसेबसे पालिका प्रशासनावर लक्ष ठेवून असले तरी नगर पालिकेचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे.
एकीकडे कोरोना संक्रमण सुरू आहे. पवनी लगत सिंदपुरी येथे कोव्हिड सेंटर आहे. तालुका प्रशासनाचे बरोबरीने काम करण्याची पालिका प्रशासनावर तेवढीच जबाबदारी असतांना महत्त्वाचे असे मुख्याधिकारी पद रिक्त असणे यावेळी तरी योग्य नाही. पवनी नगरात गेले कित्येक महिन्यापासून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईप लाईन पसरविण्यात आलेली आहे. पाईप लाईन करिता नगरातील लहान-मोठे सर्व रस्ते खोदून पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. मात्र रस्तोरस्ती दगडधोंडे व मातीचे ढीग पसरलेले आहेत त्यांचे सपाटीकरण करून रहदारीचा अडथळा कोण, केव्हा दूर करणार? हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
बाजार किंवा गुजरी भरविण्याचा प्रश्न पालिकेचे सर्वसाधारण कर्मचारी हाताळत आहेत. नियमभंग करणाऱ्या चार-दोन व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. घर बांधकामासाठी परवानगी दिली जात नाही, त्यामुळे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनधिकृत बांधकाम सुरू असल्याने नियमाची पायमल्ली होत आहे.
पवनीत शिस्त लावण्यासाठी प्रशासनात वचक असलेली व्यक्ती मुख्याधिकारी म्हणून मिळावी, अशी नगरवासीयांची भावना आहे.