रॅली अन् व्यक्तिगत भेटीवर भर

By Admin | Updated: October 26, 2015 01:01 IST2015-10-26T01:01:17+5:302015-10-26T01:01:17+5:30

प्रचाराचा माध्यम म्हणजे बॅनर. शहराच्या गल्लोगल्लीत बॅनरच बॅनर दिसताहेत. शिवाय मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार रॅली ...

Rally and personal visits | रॅली अन् व्यक्तिगत भेटीवर भर

रॅली अन् व्यक्तिगत भेटीवर भर

शहरभर ‘बॅनर वॉर’ : निवडणूक नगरपंचायतीची
राजू बांते मोहाडी :
प्रचाराचा माध्यम म्हणजे बॅनर. शहराच्या गल्लोगल्लीत बॅनरच बॅनर दिसताहेत. शिवाय मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार रॅली अन् व्यक्तीगत भेटीवर अधीक भर देत असल्याचे दिसून येत आहे.
मोहाडी नगर पंचायतीची निवडणूक आता रंगात येवू लागली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अधिकच दिवस मिळाले. त्यांच्या तुलनेत अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी समाधानकारक दिवस मिळाले. मोहाडीच्या इतिहासात प्रथमच ९९ उमेदवार मोठ्या ताकतीने निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत. निवडणूक सर करण्यासाठी विविध फंडे उपयोगात आणली जात आहेत. मतदारांना आमिष दाखविणे आता क्षुल्लक बाब झाली आहे. उमेदवारी पक्की झाल्यापासून काही उमेदवार मतदारांना देवदर्शन करून चुकले. आता काही उमेदवार मोठ्या गाड्या करून मतदारांना शेगाव शिरडी नेण्यासाठी योजना आखत आहेत. शहरात चर्चा दोन विषयावर होत असल्याचे जाणवत आहे. मागील काळात भाजपाचे राज्य होते. त्यांच्या कार्यकाळात अनेकांना कामासाठी मन:स्ताप सहन करावा लागला. कामासाठी दहावेळा येरझाऱ्या लोकांना वाईट अनुभव आले असल्याची चर्चा सुरु आहे. आता भाजपाला नगरपंचायत मध्ये रोखण्यासाठी ही संधी चालून आली असल्याचे बोलले जात आहे. आपापल्या पद्धतीने वेगवेगळे अनुमान लावत असतानी मोहाडीतील मतदार भाजपाला दुसऱ्या - तिसऱ्या नंबरवर ठेवत आहे. तसेच एकहाती सत्ता कोणालाही मिळणार नसल्याचे भाकीत मतदार करीत आहेत. दुसरा तर्क लावला जात आहे. काँग्रेस आघाडीवर राहील ही चर्चा शहरभर आहे.
पण या निवडणुकीत ३१ आॅक्टोबरच्या रात्रीपर्यंत काही खरे नसल्याचेही बोलले जात आहे. साम, दाम, दंड या नितीचा अवलंब तर होईल पण जो मतदारांच्या हातात हिरवी नोट सरकवेल तोच बाजी मारू शकतो अशीही शहरातील बरेच मतदार बोलून दाखवित आहेत. भाजपाच्या काळात कोणाला किती त्रास झाला याचा पाढा त्रास देणारे चर्चेतून भाजपाची उलटी गीणती सुरु करीत आहेत. मोहाडी नगरपंचायतच्या निवडणुकीत खरी लढत काँग्रेस - भाजपा व राकाँ या तीन पक्षात होणार आहे. शिवसेनेत व मनसेत तरुण उमेदवारांना संधी देण्यात आल्याने त्याही पक्षाचे उमेदवार विजयाकडे जाणाऱ्या उमेदवारांना रोखण्याचे काम करतील. एक मात्र पुढची चर्चा, मोहाडीत बदल हे अपेक्षित मानला जातो. निवडणुकीत महत्वाचा म्हणजे मतदारांपर्यंत पोहचणे. त्यासाठी सगळेच पक्षाचे उमेदवार रॅली काढून आपला वजन किती आहे हे दाखवित आहेत. तसेच वेळ मिळेल तशी उमेदवार व्यक्तीगत भेटीवर अधिक भर देत आहेत.
मोहाडीत लोकांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका बघितल्या आहेत. पण एवढ्या प्रमाणावर पोष्टरवॉर पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. ज्या गल्लीत जाल त्या ठिकाणी उमेदवारांचे पोष्टर दिसून येत आहेत. मोठ्या प्रमाणात शहरभर पोष्टरची संख्या दिसून येत आहे. या पोष्टरमुळे मोहाडी पूर्णत: सजलेली आहे. एक नजर पोष्टरकडे जातेच. भाजपाने एक नारा लावला आहे. केंद्रात भाजपा राज्यात भाजपा आता मोहाडी नगरातही भाजपा. केंद्र व राज्याच्या दमावर नगरपंचायतची निवडणूक मोहाडीत तरी जिंकण्याची आशा भाजपाला धुसर दिसत आहे.

Web Title: Rally and personal visits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.