मिरवणुकीत भीमाचा जयघोष
By Admin | Updated: April 15, 2015 00:41 IST2015-04-15T00:41:00+5:302015-04-15T00:41:27+5:30
मिरवणुकीत भीमाचा जयघोष

मिरवणुकीत भीमाचा जयघोष
नाशिक : प्रतिमापूजन, विविध सामाजिक उपक्र मांसह आज सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत भीमाचा एकच जयघोष करीत जयंती साजरी करण्यात आली. मिरवणुकांत बारा मंडळांचे चित्ररथ सहभागी झाले, तर २४ पेक्षा अधिक मंडळांनी शहरात विविध भागांमधून मिरवणुका काढल्या. चौकाचौकांत कार्यकर्ते, नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक आदिंतर्फे प्रतिमापूजन झाले. सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्र म राबविण्यात आले. खीरदान, जलदान, पाणपोई उद्घाटनासह गुणवंतांचा गौरव, लहान मुलांच्या स्पर्धा झाल्या. दरम्यान, जुने नाशिक येथून मोठ्या राजवाड्यातून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेले चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्याचबरोबर राजकारणी मंडळींनीदेखील यावेळी हजेरी लावली होती. त्यामध्ये आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त एस जगन्नाथन, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, नगरसेवक सलिम शेख, यशवंत निकुळे, तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे, राजू देसले आदि सहभागी झाले होते.